जगात खळबळ! भारताकडे सर्वांच्या नजरा, डोनाल्ड ट्रम्प यांना पहिला झटका, युक्रेन युद्धादरम्यानच पुतिन..

गेल्या काही वर्षांपासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाची थेट झळ भारताला बसताना दिसतंय. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अत्यंत मोठा टॅरिफ भारतावर लावण्यात आला. आता मोठी खळबळ जगात उडालीये.

जगात खळबळ! भारताकडे सर्वांच्या नजरा, डोनाल्ड ट्रम्प यांना पहिला झटका, युक्रेन युद्धादरम्यानच पुतिन..
pm modi vladimir putin and donald trump
| Updated on: Oct 02, 2025 | 3:42 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-रशिया यांची मैत्री पाहून चांगलीच पोटदुखी उठली. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता मोठा दबाव त्यांनी भारतावर टाकला. मात्र, भारत ऐकत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ लावला. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, आम्ही त्यांच्यावरील 50 टक्के टॅरिफ कमी करू असे स्पष्ट अमेरिकेने म्हटले. मात्र,  भारतापेक्षा कितीतरी पट जास्त चीन हा रशियाकडून तेल खरेदी करतो. मात्र, त्या चीनवर कोणत्याही प्रकारचा टॅरिफ हा अमेरिकेने लावला नाही. उलट चीनला टॅरिफसाठी 90 दिवसांचा वेळ दिला. भारताने अनेकदा रशियाकडून तेल खरेदी करण्याचे नेमके कारण काय ते सांगितले. भारताला कसे कोडींत पकडता येईल, याकरिता अमेरिका मोठा प्रयत्न करताना दिसत आहे.

अगोदर भारतावर मोठा टॅरिफ आणि त्यानंतर थेट फार्मा वस्तूंवर 100 टक्के टॅरिफ. भारतातूनच अमेरिकेत सर्वाधिक फार्मा वस्तूंची आयात केली जाते. अमेरिकेच्या दबावानंतर भारताने रशियासोबत काही महत्वाचे करार केली. हेच नाही तर चीनमध्ये भारत, रशिया आणि चीन एकाच मंचावर आले. भारताला ज्याप्रकारे धमक्या अमेरिका देत आहे, त्यावर मोठे भाष्य करत रशियाने अमेरिकेची चांगलीच कानउघडणी केली.

भारतावर अमेरिकेचा प्रचंड दबाव असताना भारताने स्वदेशी वस्तूंचा नारा दिलाय. यादरम्यानच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर येणार आहेत. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यातच पुतिन हे भारताच्या दाैऱ्यावर असणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच बैठक घेतली.

मात्र, या बैठकीतून काहीच निर्णय होऊ शकला नसल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली योजना बदलली असून त्यांनी स्पष्ट म्हटले की, युक्रेन युद्धादरम्यान पुतिन यांना समजवण्याची जिद्द सोडली आहे. नाटो देशांना रशियाच्या विरोधात एकत्र आणण्याची भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलीये. नाटो देशांची हवाई हद्द रशियाकडून वापरली जात असल्याचाही आरोप आहे. भारत आणि चीनवर मोठा टॅरिफ लावला जावा, असे पत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी नाटो देशांना दिले.