AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प घेणार शी जिनपिंग यांची भेट, मोठा डाव, अमेरिकन…

Donald Trump and Xi Jinping meet : डोनाल्ड ट्रम्प हे ज्याप्रकारे टॅरिफ लावत आहेत, त्यापार्श्वभूमीवर आता अनेक देश अमेरिकेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्येच चीनसोबतचा तणावही अमेरिकेचा अधिकच वाढला आहे.

जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प घेणार शी जिनपिंग यांची भेट, मोठा डाव, अमेरिकन...
Donald Trump to meet Xi Jinping
| Updated on: Oct 02, 2025 | 7:36 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांना मोठा धक्का देत म्हटले की, माझ्या आवडतीचा शब्द आता टॅरिफ असून हा शब्द मला खूप जास्त आवडत आहे. याचे कारण म्हणजे आपण लवकर श्रीमंत होऊ शकतो. आपल्याकडे जितका पैसा यापूर्वी कधीच आला नव्हता, तेवढा पैसा येतोय. काही लोक अमेरिकेचा फायदा करून घेत होते आणि बदल्यामध्ये काही देत नव्हते. आता त्यांच्यावर योग्य नियम लावलाय. अमेरिकेने भारतावर अत्यंत मोठा टॅरिफ लावला. हा टॅरिफ लावण्याकरिता त्यांनी कारण दिले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने आपण टॅरिफ लावत आहोत. मात्र, भारतापेक्षाही जास्त तेल चीन हा रशियाकडून खरेदी करतो. मात्र, त्या चीनवर कोणताही टॅरिफ अमेरिकेने लावला नाही.

मागील काही दिवसांपासून टॅरिफच्या मुद्द्यामध्ये चीन-अमेरिका यांच्यातील संबंध तणावात आहेत. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा डाव टाकत थेट म्हटले की, चार आठवड्यांत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत ते भेट घेणार आहेत. अमेरिका-चीन व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असल्याचे स्पष्ट आहे. या बैठकीचा सर्वात मोठा चर्चेचा विषय असणार ते म्हणजे सोयाबीन. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये चीन सोयाबीन खरेदी करत नसलेल्या नुकसानाचा उल्लेख केलाय.

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन हा अमेरिकेचे सोयाबीन खरेदी करत नसल्याचा आरोप केलाय. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आपल्या देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे .चीन व्यापार आणि शुल्कावर सौदा करण्यासाठी आपल्याकडून सोयाबीन खरेदी करत नाही. मागील काही दिवसांपासून चीनने अमेरिकेचे सोयाबीन खरेदी बंद केली. याचा मोठा फटका त्यांना बसताना दिसतोय.

चीनने अमेरिकेची सोयाबीन खरेदी बंद केल्याने त्याचा मोठा फटका हा तेथील शेतकऱ्यांना बसलाय. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही म्हटले की, या शुल्कातून मिळणाऱ्या महसुलाचा काही भाग शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही देणार आहोत. चीनने सोयाबीन खरेदी बंद केल्याने आता थेट डोनाल्ड ट्रम्प हेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू