Donald Trump: हे हल्ले नवीन नाहीत… हल्लेखोराकडे कोण कोणती शस्त्र? डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी माहिती

Gunman Cole Thomas Allen Weapons: हल्लेखोराविषयीची सर्व माहिती गोळा करण्यात येत आहे. तो कॉन्ट्रॅक्ट किलरशीसंबंधित आहे की या हल्ल्यामागे त्याचा दुसरा काही इरादा होता, हे तपासण्यात येणार असल्याचे FBI चे संचालक काश पटेल यांनी सांगितले.

Donald Trump: हे हल्ले नवीन नाहीत... हल्लेखोराकडे कोण कोणती शस्त्र? डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी माहिती
हल्लेखोर कोल थॉमस एलन
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 26, 2026 | 9:29 AM

Gunman Cole Thomas Allen Weapons: अमेरिकेची राजधानी वॉश्गिंटन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये रात्री जवळपास 9 वाजेच्या जवळपास हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. हल्लेखोराने हॉटेलच्या एका भागात अंधाधुंद गोळीबार केला. गोळ्यांचा आवाज येताच राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत तैनात सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी मोर्चा सांभाळला. ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ट्रम्प यांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली. कोल थॉमस एलन असे या हल्लेखोराचे नाव आहे आणि तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. तो हल्ल्याच्या पूर्ण तयारीनिशी आल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडे घातक शस्त्र होती. हल्लेखोर एकटाच आला की, त्याच्यासोबत इतर कोणी होतं, याचाही पोलीस तपास करत आहेत.

कोण-कोणती शस्त्र?

पत्रकारांसाठी आयोजित मेजवाणी कार्यक्रमात गोळीबार करणारा हल्लेखोर कोल थॉमस एलन हा कॅलिफोर्नियातील टॉरेन्स येथील रहिवाशी आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे घातक शस्त्र होती. त्याच्याकडे एक शॉटगन, हँडगन आणि इतर धोकादायक शस्त्र होती. सीक्रेट सर्व्हिस एजंटमुळे तो लागलीच टिपल्या गेला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्याच्यावर नजर होती. तो बॉलरूमध्ये शिरण्याचा प्रयत्न असताना सुरक्षा यंत्रणांनी त्याचे मनसुबे धुळीस मिळवले.

मला हे हल्ले नवीन नाहीत

ट्रम्प म्हणाले की मंचापासून हल्लेखोर दूर होता. पण लगबगीने मंचाकडे येत होता. ट्रम्प यांनी बॉलरूम आणि हॉटेलच्या एकूण रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही इमारत सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. इमारतीचा परिसर हा ड्रोन मुक्त, बुलेट प्रुफ काचेचा असायला हवा असे ट्रम्प म्हणाले. तर हल्ल्यामागे हल्लेखोराचा काय उद्देश होता, का काही दुसरा इरादा होता, हे तपासण्यात येईल असे FBI चे संचालक काश पटेल यांनी सांगितले. तपास यंत्रणांनी हल्लेखोरांशी संबंधित सर्व माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान पत्रकारांसाठी आयोजित ही मेजवाणी रद्द करण्यात आली. ट्रम्प ही मेजवाणी रद्द करू इच्छित नव्हते. पण जगभरातील माध्यम प्रतिनिधी आणि सुरक्षा रक्षकांच्या जीवाचा विचार करता, तात्काळ ही मेजवाणी रद्द करण्यात आली. आता दोन दिवसानंतर ही मेजवाणी पुन्हा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हे हल्ले आपल्यासाठी नवीन नाहीत असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्यावर झालेला हा तिसरा हल्ला आहे.

Follow Us