AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump: थोडक्यात बचावले ट्रम्प, मेजवाणी कार्यक्रमात गोळीबाराचा थरार, हल्लेखोर कोण? Iran शी कनेक्शन?

Donald Trump Reception Shooting: डोनाल्ड ट्रम्प हे थोडक्यात बचावले. वॉशिंग्टन डीसीमध्ये पत्रकारांसाठी आयोजित कार्यक्रमाबाहेर अंधाधूंद गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांना सुरक्षा रक्षकांनी वेळीच टिपले. त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. कोण होता हल्लेखोर? इराणशी त्याचे काय कनेक्शन?

Donald Trump: थोडक्यात बचावले ट्रम्प, मेजवाणी कार्यक्रमात गोळीबाराचा थरार,  हल्लेखोर कोण? Iran शी कनेक्शन?
डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, गोळीबार करणारा कोण?Image Credit source: ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरून
| Updated on: Apr 26, 2026 | 9:11 AM
Share

Cole Thomas Allen Shooter: अमेरिकेत मोठी धक्कादायक घटना घडली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या वॉशिंग्टनमधील पत्रकारांसाठी आयोजित मेजवाणीच्या कार्यक्रमात गोळीबार करण्यात आला. जगभरातील माध्यमांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. त्यावेळी हल्लेखोर या मेजवाणी कार्यक्रमात जबरदस्ती घुसण्याच्या प्रयत्नात होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला हटकताच, त्याने अंधाधुंद गोळीबार सुरू केला. सतर्क असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच रोखले आणि त्याचा एन्काऊंटर केला. कोण होता हल्लेखोर? इराणशी त्याचे काय कनेक्शन?

राष्ट्राध्यक्ष सहीसलामत बाहेर

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या मेजवाणी कार्यक्रमातून सहीसलामत बाहेर काढण्यात आले. या मेजवाणी कार्यक्रमस्थळी गोळीबार झाला. त्यावेळी ट्रम्प हे आत होते. शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. अशा घटना आमच्यासाठी नवीन नाही असे सुरक्षा रक्षकांनी फॉक्स न्यूजला सांगितले. या ठिकाणी उपस्थितांना कडक सुरक्षा प्रणालीतूनच आत सोडण्यात आले. हल्लेखोर आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडे पिस्तूल असल्याचा संशय उपस्थित गुप्तहेरांना आला. त्यांनी सुरक्षा यंत्रणांकडून त्याचा तपासणीचा प्रयत्न केला.

कोल थॉमस एलन याने लागलीच झाडली गोळी

कोल थॉमस एलन असे हल्लेखोराचे नाव आहे. तो 30-31 वर्षांचा होता. तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या मेजवाणीत शिरण्याचा त्याचा प्रयत्न होता. सिक्रेट एजन्टच्या सतर्कतेमुळे तो रडारवर आला. त्याला पकडण्याचा प्रयत्न होत असतानाच त्याने बॉलरुममध्ये एका सिक्रेट एजन्टवर गोळी झाडली. गोळीबार सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली. त्याने सात ते आठ राऊंड फायर केल्याची माहिती समोर येत आहे. सुरक्षा रक्षकांनी कव्हरअप करत त्याला घटनास्थळावरून दूर नेण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात कोल थॉमस एलन ठार झाला.

कॅलिफोर्नियाचा रहिवासी कोल थॉमस एलन याची माहिती आता तपास यंत्रणा घेत आहेत. त्याचे इराणशी काही संबंध आहेत का? याचाही तपास करण्यात येत आहे. त्याने गोळीबार का केला याविषयीची माहिती घेण्यात येत आहे. त्याचे गुन्हेगारांशी काही संबंध आहेत का याचा तपास करण्यात येत आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, गोळीबार करणारा मारला गेला आहे. त्यांनी कार्यक्रम चालू ठेवण्याचा आग्रह केला.

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल