रशियाचं आता काही खरं नाही, ट्रम्प-झेलेन्स्कींनी रचला कट, ‘ही’ दोन शहरे निशाण्यावर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला रशियावर भीषण हल्ला करण्यास सांगितले आहे. यासाठी अमेरिका युक्रेनला मिसाईल पुरवणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला रशियावर भीषण हल्ला करण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने लांब पल्ल्याची शस्त्रे दिली तर युक्रेन मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करणार का? अशा प्रश्न ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना विचारला असल्याचे समोर आले आहे.
फायनान्शियल टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. 4 जुलै रोजी ट्रम्प झेलेन्स्की यांच्यात फोनवर संभाषणा झाले होते. यात ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना विचारले की, ‘जर अमेरिकेने लांब पल्ल्याच्या मिलाईव दिल्या तर युक्रेनियन सैन्य रशियाच्या आतील लष्करी तळांवर हल्ला करू शकते का? तुम्ही मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करु शकता का?’ मात्र झेलेन्स्की यांनी यावर काय उत्तर दिले ते समोर आलेले नाही.
रशियाबाबत ट्रम्प आक्रमक
डोनाल्ड ट्रम्प हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर नाराज असल्याचे समोर आले आहे, त्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या युद्धाच्या सुरुवातीला त्यांनी युक्रेनपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता ते रशियाला कठोर आर्थिक शिक्षा आणि नाटोद्वारे मिसाईल पुरवण्यास तयार झाल्याचे समोर आले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प आणि नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांची एक बैठक झाली होती. यात ट्रम्प यांनी रशियाला इशारा दिला होता. जर युद्ध थांबले नाही तर रशियावर अधिक कर लावला जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता ट्रम्प यांनी युक्रेनला रशियावर हल्ल्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
टोमाहॉक मिसाईल देण्याचा विचार
डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला 300 किनी रेंज असणारी ATACMS मिसाईल देण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर आता ट्रम्प युक्रेनला टॉमाहॉक क्रूझ मिसाईल देण्याचाही विचार करत आहे. ही मिसाईल युक्रेनमधून थेट रशियाची राजधानी मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकते. याबाबत दोन्ही देशांमध्ये अद्याप कोणताही करार झालेला नाही. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर दबाव वाढवण्याचा निर्णय घेतल्यास ही मिसाईल युक्रेनला दिली जाण्याची शक्यता आहे.
युक्रेनसह युरोपीय देशांना दिलासा
डोनाल्ड ट्रम्प हे युक्रेनला मदत करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे युक्रेन आणि युरोपियन देशांना दिलासा मिळाला आहे. कारण युक्रेनने अमेरिकेकडे रशियावर दबाव वाढवण्याची मागणी केली होती, आता ट्रम्प या दिशेने पावले उचलत असल्याने युक्रेनला दिलाला मिळाला आहे.
