थायलंड-कंबोडिया युद्धाचे 1000 वर्ष जुन्या शिवमंदिराशी काय कनेक्शन? भारताकडून कुणाची पाठराखण, जाणून घ्या सविस्तर

Thailand Cambodia War : सध्या श्रावण महिना सुरू झाला. भोळ्या शंकराच्या मंदिरात भाविकांची गर्दी वाढत आहे. पण या देशात सध्या शिव मंदिरावरून जुंपली आहे. या दोन देशात दोन दिवसांपासून युद्ध धुमसत आहे.

थायलंड-कंबोडिया युद्धाचे 1000 वर्ष जुन्या शिवमंदिराशी काय कनेक्शन? भारताकडून कुणाची पाठराखण, जाणून घ्या सविस्तर
शिव मंदिराचा काय आहे वाद?
| Updated on: Jul 26, 2025 | 9:51 AM

थायलंड आणि कम्बोडिया याद दोन देशात पुन्हा वाद उफळला आहे. यापूर्वी मे महिन्यात दोघांमध्ये कुरबूर सुरू झाली होती. तर आता ऐन श्रावणातच त्यांच्यात युद्ध धुमसलं आहे. जवळपास 1000 वर्षांपूर्वीचे दोन शिव मंदिर त्या संघर्षासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. मीडियातील वृत्तानुसार, गेल्या दोन दिवसात या दोन्ही देशात धुमश्चक्री सुरू आहे. त्यात 20 हून अधिक जण दगावले आहेत. तर एका दिवसात 12 वेळा दोघांमध्ये संघर्ष झाला. थायलंड सरकारच्या दाव्यानुसार, 1 लाखांहून जास्त लोकांनी घर सोडले आहे. थायलंडमध्ये 15 लोकांची जीव गेला आहे. तर सर्वसामान्य जखमी झाले आहेत. या युद्धामागे चीनची खेळी असल्याचा दावा करण्यात येत आहे. कंबोडियाला हाताशी धरून दक्षिण-आशियात दबदबा तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात येत आहे.

8 जिल्ह्यात मार्शल लॉ

थायलंडने कंबोडियाच्या सीमावर्ती भागातील त्यांच्या 8 जिल्ह्यांमध्ये मार्शल लॉ घोषित केला आहे. सध्याच युद्ध बंदी, युद्ध विरामाची आशा करणे घाईचे होईल असे थायलंडचे परराष्ट्र मंत्री म्हणाले. कंबोडिया जोपर्यंत या भागातील अधिक्रमण करण्याचा प्रयत्न थांबवत नाही तोपर्यंत युद्ध बंदी आशा फोल ठरते, असे थायलंड परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे.

दरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पर्यटकांसाठी सूचना दिल्या आहेत. भारतीय नागरिकांनी थायलंड आणि कंबोडियाच्या सीमावर्ती राज्यांमध्ये विशेषतः उबोन रत्चथानी, सुरिन, सिसाकेत, बुरीराम, सा काओ, चंथाबुरी आणि ट्राट या राज्यांमध्ये पर्यटनासाठी जाऊ नये असा सल्ला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे.

शिव मंदिर आणि जमिनीसाठी झगडा

थायलंड आणि कंबोडिया, इंडोनेशिया आणि दक्षिण आशियातील अनेक देशात भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक पाऊलखूणा आहेत. कारण त्यावेळी भारतीय राजवटीचा हे देश भाग होते. थायलंडवर सियाम राजघराणे आणि कंबोडियावर खमेर राजघराण्याची सत्ता होती. दोघांमध्ये वितुष्ट होते. फ्रान्स आणि ब्रिटिश सरकारच्या काळतही येथे दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव असायचा.

प्रीह विहियर (प्रिय विहार) आणि ता मुएन थॉम मंदिरांच्या जमिनीवरील ताब्यावरून दोन्ही देशात पुर्वीपासूनच कायदेशीर आणि राजकीय वाद सुरू आहे. 1907 मध्ये कंबोडिया फ्रान्सच्या ताब्यात होता. तेव्हा दोन्ही देशात 817 किमीची सीमा, नियंत्रण रेषा आखण्यात आली होती. त्यावेळी नकाशात प्रीह विहियर (प्रिय विहार) मंदिर कंबोडियाचा भाग दाखवण्यात आला होता. त्याला थायलंडचा विरोध होता. तर मुएन थॉम मंदिर हे थायलंडमध्ये दाखवण्यात आले होते. त्यावर कंबोडियाचा दावा आहे. हे मंदिर अशा ठिकाणी आहे, जिथे नियंत्रण रेषा निश्चित नाही. दोन्ही देश या मंदिरावर दावा करतात आणि त्यावरून त्यांच्यात धुसफूस सुरू असते. खमेर साम्राज्यात कंबोडिया, लाओस, थायलंड आणि व्हिएतनामचा मोठ्या भागाचा समावेश होता.