मानवी हाडांपासून बनलेला रस्ता, काय आहे या खतरनाक हायवेचा इतिहास ?
जगात एक रस्ता असाही आहे जो केवळ दगड, माती आणि डांबरापासून तयार झालेला नाही तर त्याच्या निर्मितीत मानवी हाडांचा देखील वापर केलेला आहे.यासाठी या रस्त्याला ‘रोड ऑफ बोन्स’ म्हणजे हाडांचा रस्ता म्हटले जाते...

जगात तुम्ही वेगवेगळ्या रस्त्यांच्या संदर्भात ऐकले असेल. कुठे सर्वात लांबीचे रस्ते आहेत. तर कुठे पर्वतावर रस्ते आहेत. काही मार्ग त्यांच्या सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तर काही मार्ग धोकादायक वळणे आणि प्रतिकूल हवामानासाठी प्रसिद्ध आहेत. परंतू कधी अशा रस्त्याचे नाव ऐकले आहे का ज्यांच्या खाली हजारो लाखो मानवांचे सांगाडे आणि मानवी हाडे वापरली आहेत. जगातील हा रस्ता दगड, माती आणि डांबरापासून तयार केलेला नाही. तर याच्या निर्मितीत मानवी हाडांचा वापर केलेला आहे. यामुळे या रस्त्याला रोड ऑफ बोन्स म्हटले जाते. म्हणजेच या रस्त्याला हाडांचा रस्ता म्हटले जाते. या रस्त्याचे नाव ऐकले तरी भीतीने थरकाप उडतो. परंतू यामागची कहानी जास्त भयानक आहे. तर चला पाहूयात मानवी हाडांपासून बनलेला हा रस्ता कुठे आहे ? या खतरनाक रस्त्याचा इतिहास का आहे ?
कुठे आहे हा रस्ता ?
हा रस्ता रशियाच्या अतिशय दूर आणि थंड भागात आहे. हा एक मोठा लांबलचक हायवे असून याचे नाव कोलयमा हायवे ( Kolyma Highway ) आहे. याची लांबी २,०२५ किलोमीटर आहे. रशियाचा हा भाग इतका थंड आहे की वर्षाचे अनेक महिने येथे बर्फ जमलेले असते. येथील रस्ते नेहमी पांढऱ्या बर्फाच्या जाड थरात गायब होतात.
या हायवेवर आजही अनेक जागी मानवाची हाडे आणि सांगाडे सापडतात. हे ऐकून तुम्हाला एखादा हॉरर सिनेमा वाटेल, परंतू हे संपूर्ण सत्य आहे. असे म्हटले जाते रस्त्यावर बर्फ जमल्याने येथे कार घसरत होत्या. त्यावेळी तंत्रज्ञानाचा अभाव होता. त्यामुळे रस्त्यांना मजबूत करण्यासाठी दगड, रेती आणि मानवी हाडे देखील मिक्स केली जात होती. ही हाडे त्या हजारो मजूर आणि कैद्यांची होती जे या हायवेच्या निर्मिती दरम्यान मृत पावले. असे म्हटले जाते या रस्त्याच्या निर्मितीवेळी अडीच लाख ते १० लाख लोक मरण पावले होते.त्यांचे रक्त, त्यांचा घाम आणि त्यांची हाडे सर्व या रस्त्यांत गाडले गेले आहे. याच कारणामुळे जग आज देखील या हायवेचा सन्मान आणि भीती दोन्ही नजरेने पहाते.
का म्हणतात याला रोड ऑफ बोन्स?
या रस्त्याची निर्मिती सोव्हीएत हुकूमशाह जोसेफ स्टॅलिन यांच्या काळात झाली होती. १९३० च्या दशात जेव्हा या रस्त्यांच्या बांधकामास सुरुवात झाली तेव्हा लाखो कैदी आणि मजूरांना या भागात पाठवण्यात आले. येथील कामाची परिस्थिती इतकी भयानक होती की जो कैदी एकदा येथे आला, तो पुन्हा जाऊ शकला नाही. येथील थंडी इतकी तीव्र होती की तापमान नेहमीच – ५० डिग्रीहून खाली जात होते. न जेवळ, न राहण्याची जागा, न कपडे.जे लोक येथे काम करता-करता मरत होते. त्यांच्या देहाला दफन करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. त्यांच्या देहाला थेट रस्त्याखाली दाबले जायचे. त्यामुळे या हायवेला लाखो मृतांच्या हाडांवर बनलेला हायवे म्हटले जाते. आजही कोलयमा हायवेवर वाहने धावतात. लोक याला Adventure Road रोडच्या रुपात पाहतात.
