White House Shooting : लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान थेट गोळीबार, महिला पत्रकाराने स्वतःचे कसे बचावले प्राण? सर्वकाही कॅमेऱ्यात कैद

White House Shooting : अमेरिकेतील व्हाईट हाऊस गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना महिला पत्रकाराला गोळीबाराचा आवाज आहे.. व्हिडीओमध्ये घडलेली सर्व घटना कैद.

White House Shooting : लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान थेट गोळीबार, महिला पत्रकाराने स्वतःचे कसे बचावले प्राण? सर्वकाही कॅमेऱ्यात कैद
White House Shooting
| Updated on: May 24, 2026 | 8:54 AM

White House Shooting : गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प निशाण्यावर आहेत. आता देखील अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये, व्हाईट हाऊसजवळील एका सुरक्षा चेकपॉइंट एका अज्ञात व्यक्तीने अचानक गोळीबार केला. ज्यामुळे खळबळ उडाली आहे. अशात, त्याठिकाणी लाईव्ह रिपोर्टिंग करत असेलल्या एका महिला पत्रकाराला गोळीबार झाल्याचा आवाज आला, तेव्हा तिने स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी तेथून पळ काढला. अमेरिकेतील वेळेनुसार, शनिवारी सायंकाळी जवळपास 6 वाजता व्हाईट हाऊसच्या बाहेर एक महिला लाईव्ह रिपोर्टिंग करत होती. तेव्हा गोळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर पत्रकाराने तेथून पळ काढला आणि टेबलच्या खाली लपताना दिसली. ही संपूर्ण घटना त्याच कॅमेऱ्यात शूट झाली, ज्यामध्ये ती लाईव्ह रिपोर्टिंग करत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने 20 ते 25 राऊंड फायरिंग केली. प्रत्युत्तर म्हणून, हल्लेखोराला जागीच गोळ्या घालून ठार करण्यात आले. यात आणखी एक व्यक्ती जखमी झाली. व्हाइट हाऊसमध्ये काम करणाऱ्या इतर पत्रकारांनीही गोळीबाराचे आवाज ऐकल्याचं सांगितलं. गोळीबारानंतर लगेचच, सर्व पत्रकारांना सुरक्षेसाठी प्रेस ब्रीफिंग रूममध्ये जाण्यासाठी सांगण्यात आलं.

चेकपॉइंटवर आल्यानंतर बॅगेतून काढली बंदूक

अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसने एक निवेदन जारी करत महत्त्वाची माहिती सांगितली आहे, शनिवारी सायंकाळी 6 वाजल्यानंतर एक अज्ञात व्यक्ती व्हाईट हाऊसच्या सुरक्षा चेकपॉइंटवर आला. त्याने अचानक आपल्या बॅगेतून शस्त्र बाहेर काढलं आणि तेथे तैनात असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली.

चेकपॉइंटवर तैनात असलेल्या गुप्तचर सेवेच्या जवानांनी क्षणाचा देखील विलंब न करता प्रत्युत्तर देत गोळीबार केला आणि संशयित हल्लेखोराला ठार केलं. सुरक्षा दलांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेत एक सामान्य नागरिक देखील जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

सिक्रेट सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते आणि ते सुरक्षित आहेत. यापूर्वी, सिक्रेट सर्व्हिसने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सांगितलं होतं की, त्यांना व्हाईट हाऊसपासून फक्त एक ब्लॉक अंतरावर असलेल्या 17 व्या स्ट्रीट आणि पेनसिल्व्हेनिया ॲव्हेन्यू NW जवळ गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे.

Follow Us