कतारनंतर इस्राईलचे पुढचे टार्गेट कोण ? कुठे-कुठे आहेत हमासचे अड्डे

इस्राईलने कतारवर केलेल्या हल्ल्यानंतर हमासच्या नेटवर्कची चर्चा सुरु झाली आहे. हमासचे नेते अनेक देशात आश्रयाला आहेत. त्यामुळे इस्राईलचे पुढे टार्गेट कोणता देश असणार याची चर्चा सुरु आहे.

कतारनंतर इस्राईलचे पुढचे टार्गेट कोण ? कुठे-कुठे आहेत हमासचे अड्डे
hamas army wing
| Updated on: Sep 10, 2025 | 9:55 PM

Hamas political Bureau : इजराइल के कतर पर हमले के बाद, हमास के वैश्विक नेटवर्क पर चर्चा तेज हो गई है. हमास के प्रमुख नेता कतर और तुर्की जैसे देशों में शरण लिए हुए हैं, जबकि उसके छोटे कार्यालय कई अन्य देशों में मौजूद हैं. दोहा पर हमले के बाद लोग ये जानने के लिए उत्सुक हैं कि हमास के ठिकाने किस-किस देश में है और इजराइल अगला हमला कहां कर सकता है.

इस्राईलने मंगळवारी हमासच्या पॉलिटिकल ब्युरो आणि इतर अधिकाऱ्यांना टार्गेट करण्यासाठी कतारची राजधानी दोहात हवाई हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. कतार हा अमेरिकेचा सहकारी म्हटला जातो. अशात राजधानी दोहावरील हल्ल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हमासचे नेते आता त्यांच्या परदेशातील अड्ड्यांवरही सुरक्षित राहिलेले नाहीत हे या हल्ल्याने स्पष्ट झाले आहे.

हमास केवळ गाझापट्टीत नाही, त्याची राजकीय कार्यालये अनेक देशात पसरलेले आहेत. ते धोरणे आणि फंडींगसाठी काम करत असतात.हमासच्या अनेक सदस्यांनी या देशात शरण घेतली आहे. कतारमध्ये हमासचा पॉलिटिकल ब्यूरो साल 2012 पासून आहे. या आधी हा ब्युरो सिरियात काम करत होता. परंतू तेथे गृहयुद्ध सुरु झाल्यानंतर तो दोहा येथे शिफ्ट झाला. कतारने तेव्हापासून हमासचे वरिष्ठ नेत्यांना ( उदा. खालीद मशाल आणि खलील अल-हय्या ) दोहात आश्रय दिला आहे. हे कार्यालय मध्यस्ती करणे, धोरणात्मक निर्णय घेणे, आणि वित्तीय घडामोडीचे केंद्र बनल होते.

हमासचे अधिकारी खलील-अल-हय्या आणि खालिद माशाल

Hamas officials Khalil al-Hayya and Khalid Mashal

या नेत्यांना टार्गेट करण्यासाठी इस्राईलने मंगळवारी कतारवर हल्ले केले. गाझात आधीच इस्राईलने हमासच्या वरिष्ठ फळीतील नेत्यांना संपवले आहे. हमासचे अजूनही अनेक मोठे नेते वेगवेगळ्या देशात आश्रयाला आहेत.त्यामुळे आता इस्राईलचे पुढचे टार्गेट कोणता देश असणार याकडे लक्ष लागले आहे.

कोणत्या देशात आहे हमासचे नेते ?

हमास ( हरकत अल-मुकावमा अल-इस्लामिया ) इजिप्तची संघटना मुस्लीम ब्रदरहुड पासून तयार झाली आहे. सुरुवातीला तिची इजिप्तमध्ये तिची मजबूत उपस्थिती होती. परंतू सीसी सरकारने ब्रदरहुडवर बंदी घातल्यानंतर इजिप्तमध्ये हमासची पकड ढीली झाली. या शिवाय हमासचे साल 2011 पासून इस्तंबुल आणि अंकारा येथेही सक्रीय कार्यालय आहे. अनेक जाणकाराच्या मते इस्राईलचा पुढचा हल्ला येथेच होऊ शकतो. कारण या देशात हमास सक्रीय असेल तरी त्याचे टॉप लीडर या वेळी तुर्की आणि कतारमध्ये आश्रयाला आहेत.

या सोबतच हमासचे संपूर्ण कार्यालयाच्या ऐवजी कॅडर आधारित कार्यालये लेबनान, इराण, सिरीया आणि इराकमध्ये आहेत. यातही इराण, लेबनॉन आणि इराक येथे हमास थोडा मजबूत आहे. कारण येथे त्याला हिजबुल्लाह सारख्या इराणी समर्थित गटांचा पाठींबा आहे.

हमासचे फंडींग नेटवर्क

या शिवाय मध्य पूर्व आणि आफ्रीकासह युरोपच्या अनेक देशात हमासशी संलग्न लोक सक्रीय आहेत. अल्जेरिया, सूदान, यमन, सौदी अरब येथे हमासचे फंडींग नेटवर्क वा कॅडर आहे. परंतू संपूर्ण सुसज्ज कार्यालय नाही. या देशांकडून हमास आधी फंडींग मिळत होती.

अलिकडे वाढलेल्या टार्गेट किलिंग सारख्या घटनानंतर हमासचे नेते परदेशातील गुप्त जागांवर रहात आहेत. अमेरिका आणि युरोपीय युनियन हमासला एक अतिरेकी संघटना मानतात, परंतू अनेक देश हमासला पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी एक गट मानत आहेत.

युद्धविरामाची बोलणी संपवण्यासाठी कतारवर हल्ला ?

कतारवर झालेल्या या हल्ल्याला अनेक देशांनी ‘स्टेट टेरर’ असे नाव दिले आहे. इस्राईलने शांततेची बोलणी करणाऱ्या टीमला टार्गेट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी गेल्या वर्षी इस्राईलने इराणमध्ये हमासचे पॉलीटीकल चिफ इस्माईल हानिया यांची हत्या केली होती. तेव्हा इस्माईल हानिया अमेरिकेच्या वतीने सादर केलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी गेले होते आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांच्या शपथविधीच्या समारंभात सामील होण्यासाठी तेहराणला गेले होते.

इस्माईल हानियाच्या हत्येनंतर युद्धविराम डील पुढे ढकलली गेली. या हल्ल्याला देखील इस्राईलद्वारा केलेल्या युद्धविरामच्या शक्यतेला संपवण्यासाठी केलेला हल्ला मानला गेला आहे.