दुबईत आपल्या लाडक्या पेट्सना रस्त्यांवर का सोडत आहेत लोक? समोर आले हैराण करणारे कारण

दुबईला इराण युद्धाची झळ बसली आहे. इराणचे ड्रोन कुठून येईल याची कोणतीही शाश्वती नसल्याने दुबईतील लोक एका वेगळ्याच समस्येने हैराण झाले आहेत. लोक आपल्या पाळीव प्राण्यांना सोडून शहर सोडत आहेत. त्यामुले प्राणी प्रेमी नाराज झाले आहेत.

दुबईत आपल्या लाडक्या पेट्सना रस्त्यांवर का सोडत आहेत लोक? समोर आले हैराण करणारे कारण
dog
| Updated on: Mar 10, 2026 | 5:42 PM

इराणवर अमेरिका आणि इस्राईलने हल्ल्या केल्यानंतर इराणने शेजारील ९ मुस्लीम राष्ट्रांना देखील टार्गेट केले आहे. यामुळे एरव्ही सुरक्षित वाटणारी दुबई देखील आता त्रस्त झाली आहे. इराणने युएईतील दुबईसह अनेक शहरांना ड्रोन हल्ल्याने टार्गेट केले आहे. दुबईतील हल्ल्यानंतर तेथे रस्त्यांवर लोक आपले पाळीव प्राणी अचानक सोडून देत आहेत. काय आहे या मागे कारण ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा मोठा धक्का बसेल….

डेली स्टारच्या बातमीनुसार दुबईतील प्राणी प्रेमींकडून असा विचित्र हट्ट होत आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांचे डॉक्टर हैराण झाले आहेत. वास्तविक पाळीव प्राण्यांचे मालकांनी या प्राण्यांना इच्छामृत्यू देण्यात यावा अशी मागणी या पशु चिकीत्सकांना केली आहे. तसेच दुबईतील अनेक पशू कल्याण केंद्रात मरण्यासाठी सोडलेल्या मुक्या जनावरांची संख्या प्रचंड वाढली आहे.

सोशल मीडियावर दुबईतील काही रस्त्यांवर विजेच्या खांबांना बांधलेल्या उपाशी कुत्र्यांचे फोटो व्हायलर होत आहेत. द बार्किंग लॉट नावाच्या एका संस्थेच्या एका स्वयंसेवकाने सांगितले की काही पशु तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी तर असेही सांगितले की काही पाळीव प्राणी चांगले आरोग्यदायी असूनही त्यांना इच्छामृत्यू देण्याची मागणी असे पशुमालक करत आहेत. कारण त्यांना आता हे प्राणी अडसर ठरत आहेत. कारण दुबईत पशुंना ट्रान्सफर करण्याच्या कागदोपत्री कारवाई मोठी आणि किचकट आहे.

मध्य पूर्वेत बाहेर पडण्यासाठी चढाओढ

दुबईतील हल्ल्यांमुळे अनेक अब्जाधीशांनी लवकरात लवकर दुबई सोडण्यास प्राधान्य दिले आहे. परंतू हे पाळीव प्राणी सोबत असल्यास सीमापार जाणे कठीण असल्याचे म्हटले जात आहे.अनेक पाळीव जनावरांना त्यामुळे अशा प्रकारे सोडले जात आहे. मध्य पूर्वेत अजूनही अनेक ब्रिटीश नागरिक अडकले आहे. १,००००० हून अधिक लोकांनी बाहेर पडण्यासाठी परराष्ट्र कार्यालयात नोंदणी केली आहे. यात त्यांनी त्यांच्या पाळीव प्राण्याची नोंदणी केलेली नाही.

मिररच्या वृत्तानुसार दुबईत राहणारे हजारो ब्रिटीश लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांना तेथेच सोडून जाण्यासाठी मजबूर झाले आहेत. अनेक लोकांनी आपले सामान पॅक करुन आपल्या कुटुंबियांसह परतण्याची योजना केली आहे. परंतू त्यांनी त्यांचे पेट्स तेथेच वाऱ्यावर सोडले आहेत.

स्थानिक डॉग रिहाऊसिंग समुह K9 फ्रेंड्स दुबई यांनी सांगितले की आपल्या पाळीव प्राण्यांना सोडण्यास इच्छुक मालकांच्या कॉलमुळे त्रास वाढला आहे. दुबईसह संपूर्ण मध्य पूर्वेत इराण आणि इस्राईलद्वारा मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याने संपूर्ण क्षेत्रात वाहतूक ठप्प झाल्याने पाळीव प्राण्याचे संकट आणखी गंभीर बनले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us