
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने काल दक्षिण इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर एअर स्ट्राइक केला. या हल्ल्यानंतर इराणही आक्रमक झाला आहे. त्यांनी आखाती देशांच्या तेल विहिरींवर हल्ले केले आहेत. कतरपासून सौदी अरेबियापर्यंत तेल विहिरींमध्ये आग भडकली आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर स्वत: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेटमेंट जारी केलय. इस्रायल पार्स गॅस फिल्डवर हल्ला करेल याची आम्हाला कल्पना नव्हती असं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले आहेत. मध्य पूर्वेत जे काही सुरु आहे, त्यामुळे रागात येऊन इस्रायलने साऊथ पार्स गॅस फिल्डवर हल्ला केला असं ट्रम्प म्हणाले आहेत. हे संपूर्णपणे इस्रालयच ऑपरेशन होतं असं ट्रम्प म्हणाले. अमेरिकेला या हल्ल्याबद्दल काही माहित नव्हतं, कल्पना सुद्धा नव्हती असा त्यांनी दावा केला.
साऊथ पार्स गॅस फिल्डवरील इस्रायली हल्ल्याची फ्रान्सने सुद्धा निंदा केली आहे. मी राष्ट्रपती ट्रम्प यांच्याशी बोललो आहे असं फ्रान्सचे राष्ट्रापती मॅक्रो म्हणाले. ऊर्जा आणि जल पुरवठा करणाऱ्या प्रकल्पांवर लगेच हल्ले रोखले पाहिजे तेच सर्वांच्या हिताचं आहे असं मॅक्रो यांनी सांगितलं. ऊर्जा पुरवठ्यावर सैन्य तणावाचा परिणाम होऊ नये. ओमानने सुद्धा इस्रायलच्या कारवाईचा निषेध केला आहे. संयुक्त अरब अमिरातीने म्हटलय की, यामुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
या फिल्डमध्ये किती मोठं गॅसचं भंडार?
साऊथ पार्स जगातील सर्वात मोठं नैसर्गिक वायूच गॅस भंडार आहे. साऊथ पार्स 9,700 वर्ग किलोमीटरचं गॅस क्षेत्र आहे. इराण आणि कतरमध्ये याची विभागणी झाली आहे. साऊथ पार्सचा एक तृतीयांश भाग इराणकडे तर नॉर्थ फिल्डचा भाग कतरकडे आहे. रॉयटर्सनुसार या संपूर्ण भागात 1800 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅस भंडार आहे. या फिल्डमधून सगळ्या जगाची 13 वर्षाची इंधनाची व्यवस्था होऊ शकते. यावरुन हे गॅस फिल्ड किती मोठं आहे ते लक्षात येतं. 35 वर्ष वीज उत्पादन चालू शकतं.
इराणसाठी हे गॅस फिल्ड का महत्वाचं?
आंतरराष्ट्रीय एनर्जी एजन्सीनुसार, इराण नैसर्गिक वायूचा वापर करणारा जगातील चौथा मोठा ग्राहक देश आहे. साऊथ पार्स इराणच्या ऊर्जा पुरवठ्याचा आधार आहे. इराणमध्ये जवळपास 80 टक्के वीज गॅसमधून निर्माण होते. त्याचा अधिकांश भाग साऊथ पार्समधून येतो. इराक सारख्या देशासाठी सुद्धा ही फिल्ड महत्वाची आहे. कारण त्यांना 40 टक्के गॅस पुरवठा या इराणी गॅस फिल्डमधून होतो.
याआधी इथे हल्ला कधी झालाय?
इराणच्या या गॅस फिल्डला इस्रायलने लक्ष्य करण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी मागच्यावर्षी जून महिन्यात इराण विरुद्ध युद्धात इस्रायलने या गॅस फिल्डवर हल्ला केला होता. त्यावेळी साऊथ पार्समधील फेज 14 च्या चार युनिट्सना लक्ष्य केलं होतं. कतरच्या गॅस साइटपासून ही युनिट्स 200 किमी लांब होती.