
भारताची शेजारी असलेले चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना अफगाणिस्तानचं नाव घेतलं तर धडकी भरते. तसं पाहिलं तर अफगाणिस्तानकडे मोठं असं काही नाही. पण बलाढ्य महासत्ता असलेल्या देशांनी हल्ले केले. मात्र अफगाणिस्तानचं रुप काही बदलू शकले नाही. अशा स्थितीवर मात करत अफगाणिस्तानवर तालिबान राज्य आहे. पण असं असताना शेजारी असलेल्या चीन आणि पाकिस्तानला अफगाणिस्तानची भीती वाटते. अफगाणिस्तानातील सुरक्षा, अंतर्गत अस्थिरता आणि आर्थिक हितसंबंधांमुळे दोन्ही देश अस्वस्थ आहेत. पाकिस्तान आणि चीनवर हल्ला करणाऱ्या तीन प्रमुख अतिरेकी संघटना या अफगाणिस्तानातून काम करत असल्याचं आरोप आहे. या संघटाा चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरवर कार्यरत असलेल्या चिनी आणि पाकिस्ताना नागरिकांना लक्ष्य करतात. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि ईस्टर्न तुर्किस्तान इस्लामिक मूव्हमेंट (ईटीआयएम) आणि बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) यांनी पाकिस्तान आणि चीनला वारंवार त्रास दिला आहे.
अमेरिकेने सैन्य माघार घेतल्यानंतर ऑगस्ट 2021 पासून तालिबान सत्तेत आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहे. तसचे चीनमधील उइगर मुस्लिमांना बळ देण्याचं काम ईटीआयएम करत असल्याचा आरोप होत आहे. मागच्या सहा महिन्यात टीटीपीने पाकिस्तानात एक हजाराहून अधिक हल्ले केले. यापैकी 300 हल्ले फक्त जुलै महिन्यात झाले. टीटीपी 2007 पासून वेगळ्या पश्तून राष्ट्राची मागणी करत आहे. बीएलए बलुचिस्तान प्रातांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. या संघटनेची स्थापना 200 साली झाली होती. या संघटनेने बलुचिस्तान स्वातंत्र्य राष्ट्र घोषित केलं आहे. ही संघटना गनिमी काव्याने पाकिस्तानी सैन्य, सरकार आणि चीनी प्रकल्पांना लक्ष्य करतात.
ईस्टर्न तुर्किस्तान इस्लामिक मूव्हमेंटची स्थापना 1990 पासून झाली आणि त्यांची शिनजियांग हे वेगळं राष्ट्र करण्याची मागणी आहे. या भागात 1.7 कोटी उइगर मुस्लिम राहतात. अफगाणिस्तानच्या या रणनितीमुळे उइगर फुटीरतावाद्यांना खतपाणी मिळत आहे. त्यामुळे शिनजियांग प्रांताला धोका असल्याचं चीनचं म्हणणं आहे. या दहशतवादी संघटनेने आतापर्यंत चीनवर 8 मोठे हल्ले केले आहेत. यात 260 चिनी लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्र या तीन संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. पण अफगाणिस्तानने आपल्या भूमीत एकही दहशतवादी गट नाही असं सांगितलं आहे.