AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डायनासोरच्या अंड्यासारखं… ‘, नासाच्या रोव्हरने मंगळ ग्रहावर शोधल्या सजीव असल्याच्या पाऊलखुणा!

मंगळ ग्रहाबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. मंगळावर मानवासारखी सजीव सृष्टी असल्याचं अनेकांना वाटतं. पण तसं काही हाती लागलं नाही. पण नासाच्या रोव्हरने काही पाऊलखुणा शोधल्या आहे. त्यामुळे या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

'डायनासोरच्या अंड्यासारखं... ', नासाच्या रोव्हरने मंगळ ग्रहावर शोधल्या सजीव असल्याच्या पाऊलखुणा!
'डायनासोरच्या अंड्यासारखं... ', नासाच्या रोव्हरने मंगळ ग्रहावर शोधल्या सजीव असल्याच्या पाऊलखुणा!Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Aug 22, 2025 | 3:40 PM
Share

सूर्यमालेत सूर्यापासून तिसरा ग्रह हा पृथ्वी आहे. तर चौथ्या स्थानावर लाल भडक असा मंगळ ग्रह आहे. पृथ्वीच्या अगदी बाजूला हा ग्रह आहे. त्यामुळे पृथ्वीप्रमाणे मंगळ ग्रहावर जीवन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात संशोधक मंगळ ग्रहावरील जीवन शोधण्याचा प्रयत्न करत आहे. खरंच तिथे मानवी वस्ती आहे का? की इतर सजीव राहतात असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासा गेल्या काही वर्षांपासून मंगळ ग्रहाचा अभ्यास करत आहे. यासाठी नासाने मंगळावर रोव्हर पाठवलं आहे. त्या माध्यमातून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. असं असताना नासाच्या रोव्हरने डायनासोरच्या अंड्यासारखी एक प्रतिकृती शोधली आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे मंगळावर जीवन असावं असे संकेत या माध्यमातून पुन्हा एकदा मिळत आहेत. त्यामुळे संशोधनाला पुन्हा एकदा जोर चढला आहे.

रोव्हरने शोधलेली प्रतिकृती डायनासोरची अंडी नसलं तरी त्याच्या आकारामानामुळे कुतुहूल निर्माण झालं आहे. मंगळाच्या भूगर्भीय आणि संभाव्य जैविक इतिहासाबद्दल संशोधनाचा वेग वाढणार आहे. ही प्रतिकृती गुळगुळीत आणि गोलाकार आहे. त्यावरील काही रचना या दगडाइतक्या लहान आहेत. तर काही फुटबॉलसारख्या आहेत. पृथ्वीवर अशाच रचना ज्वालामुखी प्रक्रियेतून तयार होतात. या संरचनेत प्राचीन जीवनाच्या काही खुणा लपलेल्या असू शकतात.

मंगळावर पाठवलेलं क्युरिऑसिटी रोव्हर अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे. आसपासच्या वस्तूंचं हाय रिझोल्यूशन फोटो घेते आणि लेझर स्पेक्ट्रोस्कोपीने त्याचं विश्लेषण करते. त्यामुळे याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जर मंगळावरील प्राचीन जीवनशैलीचा शोध लागला तर तिथल्या अस्तित्वाबाबतच्या चर्चेला नवं रुप प्राप्त होईल. मंगळावरील वातावरण अत्यंत आव्हानात्मक आहे. तिथलं तापमान, धुळीचं वादळं आणि ओबडधोबड पृष्ठभाग अशा स्थितीत रोव्हरला कामं करणं कठीण आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने या सर्व संकटांवर मात केली असून शोध लावण्याचं काम सोपं केलं आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.