Putin Right Hand Secret : पुतिन चालताना त्यांचा उजवा हात का हलवत नाहीत? एका देशाच्या यूनिवर्सिटीने चक्क रिसर्च करुन शोधून काढलं कारण?

Putin Right Hand Secret : न्यूरोलॉजी प्रोफेसर बास्टियान ब्लोम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिलं की, पुतिन अनेकदा त्यांचा उजवा स्थिर ठेवतात. अजिबात तो हात हलत नाही. डावा हात मात्र फिरत असतो.

Putin Right Hand Secret : पुतिन चालताना त्यांचा उजवा हात का हलवत नाहीत? एका देशाच्या यूनिवर्सिटीने चक्क रिसर्च करुन शोधून काढलं कारण?
Russian president Vladimir Putin
Updated on: Dec 04, 2025 | 1:17 PM

व्लादिमीर पुतिन आज भारतात येणार आहेत. त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये उत्सुक्ता असते, अशा अनेक गोष्टी चर्चेत आहेत. अशीच चर्चा पुतिन यांचा हात आणि बॉडी डबलबद्दल होते. असं म्हणतात की, पुतिन चालताना त्यांचा उजवा हात हलत नाही. सोबतच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ते बॉडी डबलही सोबत ठेवतात असं म्हणतात. नेमकं सत्य काय आहे? आणि असं असेल, तर त्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या.

पुतिन यांच्या हाताला कोणताही आजार नाहीय. त्यांना स्ट्रोक किंवा पार्किंसंसही झालेला नाही. पण, तरीही चालताना त्यांचा उजवा हात नेहमी स्थिर असतो. याकडे एक्सपर्टनी लक्ष द्यायला सुरुवात केली, तेव्हा रशियन राष्ट्राध्यक्षांचा खास हाव-भाव चर्चेचा विषय बनला. एक्सपर्टना असं वाटतं की, त्यांना या मागच कारण कळलय.

कुठल्या यूनिवर्सिटीने अभ्यास केला?

एनबीसी न्यूज रिपोर्टनुसार, नेदरलँडच्या रेडबाऊंड यूनिवर्सिटी मेडिकल सेंटरचे न्यूरोलॉजी प्रोफेसर बास्टियान ब्लोम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहिलं की, पुतिन अनेकदा त्यांचा उजवा स्थिर ठेवतात. अजिबात तो हात हलत नाही. डावा हात मात्र फिरत असतो.

YouTube वरील व्हिडिओ पाहिले

केजीबीमध्ये शस्त्रास्त्र चालवण्याचं प्रशिक्षण दिलं, त्यामुळे असं झालेलं असू शकतं. रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे अनेक YouTube वरील व्हिडिओ पाहिले. यात त्यांच्या उजव्या हाताची हालचाल पाहण्यात आली. ब्लोम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिश मेडिकल जर्नलचं ऑनलाइन प्रकाशन ‘द बीएमजे’ मध्ये यावर लेख लिहिलाय.

अभ्यासात काय आढळलं?

ब्लोम एक गती विकार एक्सपर्ट आहेत. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही काळासाठी विचार केलेला की, हा पार्किंसन्सचा आजार असू शकतो. कारण शोधून काढण्यासाठी अभ्यास करताना रशियन केजीबीच्या ट्रेनिंगच एक मॅनुअल मिळालं. केजीबी ही रशियन गुप्तचर संस्था आहे. या मॅन्यूलनुसार, केजीबी एजंट्सना शस्त्र उजव्या हातात छातीजवळ ठेवायला सांगितलेलं.

गनस्लिंगरची चाल

रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव, दोन माजी संरक्षण मंत्री आणि अनातोली सिदोरोव या सैन्य कमांडरच्या चालण्याचा सुद्धा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर एक्सपर्टच्या टीमने हा निष्कर्ष काढला. ब्लोम म्हणाले की, चालण्याचा हा नवीन पॅटर्न ज्याला आम्ही गनस्लिंगरची चाल म्हणतो.

का असं चालतात?

हा वर्षानुवर्षाच्या सवयीचा एक भाग असू शकतो. केजीबी आणि अन्य शस्त्रास्त्र प्रशिक्षणापासून प्रेरित आहे. ट्रेनींना आपला उजवा हात छातीच्या जवळ ठेवायला शिकवला जातं. जेणेकरुन शत्रुचा सामना झाल्यानंतर तात्काळ बंदुक काढता येईल.