AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Air strike in Pakistan | …म्हणून बदल्याच्या आगीत होरपळणाऱ्या इराणचा पाकिस्तानवर मोठा Air strike

Iran Air strike in Pakistan | पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश अल-अदलच्या ठिकाणांवर इराणने हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात त्यांचे 2 तळ उद्धवस्त झाले आहेत. दोन लहान मुलींचा मृत्यू झालाय. 3 मुली जखमी आहेत. आता इराणने पाकिस्तानवर हल्ला का केला? त्यामागे काय कारण आहे? समजून घ्या.

Iran Air strike in Pakistan | ...म्हणून बदल्याच्या आगीत होरपळणाऱ्या इराणचा पाकिस्तानवर मोठा Air strike
Iran Air strike in Pakistan
| Updated on: Jan 17, 2024 | 10:27 AM
Share

Iran Air strike in Pakistan | दावोसच्या विश्व आर्थिक फोरममध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री होसैन अमीर-अब्दुल्लाहियन आणि पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अनवर उल हक काकर यांची भेट झाली. त्याचवेळी इराणी मीडियानुसार, इराणच्या IRGC ने पाकिस्तानच्या बलूचिस्तानमध्ये जैश-अल-अदलच्या दोन दहशतवादी तळांना मिसाइल आणि ड्रोनने टार्गेट केलं. यात 2 लहान मुलांचा मृत्यू झाला असून 3 मुली जखमी झाल्या आहेत.

पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात कुहे सब्ज क्षेत्रात जैश उल-अदलचा मोठा दहशतवादी तळ होता, असं इराण सरकारच्या मेहर वृत्त संस्थेने म्हटलय. आपल्या हवाई क्षेत्राच उल्लंघन केल्याबद्दल पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणचा निषेध केला आहे. पाकिस्तानने या हल्ल्याला बेकायद कृत्य ठरवलं. पाकिस्तानने तेहरानमध्ये इराणच्या पराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यासमोर कठोर शब्दात निंदा केली आहे. इराणी दूतावासाच्या अधिकाऱ्याला सुद्धा पाकिस्तानने बोलवून घेतलय.

इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्सने काय म्हटलय?

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, जैश उल-अदल ही पाकिस्तान-इराण सीमेवर सक्रीय असलेली दहशतवादी संघटना आहे. त्यांनी इराणी सुरक्षा पथकांवर हल्ले केले आहेत. एअर स्ट्राइक हा जैश अल अदलने केलेल्या हल्ल्याचा बदला आहे, अस इराणने म्हटलय. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सनुसार डिसेंबर महिन्यात जैश अल अदलने इराणमध्ये मोठा हल्ला केला होता. यात इराणच्या 11 पोलिसांचा मृत्यू झाला होता.

इराणने काय स्पष्ट केलय?

जैश अल अदलच्या हल्ल्यात इराणच मोठ नुकसान झालं होतं. जैश अल अदल ही संघटना आधी सुन्नी बलूच संघटना जुंदल्लाहसोबत होती. ते नंतर वेगळे झाले. पाकिस्तानच्या ISI सोबत जुंदल्लाह आणि जैश अल अदलचे घनिष्ठ संबंध आहेत. पाकिस्तानने इराण विरोधात जैश अल अदलचा वापर केला. इराणने या बद्दल वारंवार पाकिस्तानकडे नाराजी व्यक्त केली होती. कुठलीही दहशतवादी संघटना आमच्याविरोधात कारवाई करत असेल, तर आम्ही त्यासाठी कुठल्याही पातळीपर्यंत जाऊ हे इराणने स्पष्ट केलय

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.