नेपाळमध्ये रविवारी सुट्टी का नाही ? सातही दिवस करतात काम लोक ?

आपला शेजारील देश नेपाळ येथील Gen Z आंदोलन जगभरातील चर्चेचा विषय ठरले आहे. रविवारी सुशीला कार्की यांनी नेपाळचे अंतरिम पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. नेपाळमध्ये रविवार हा सुट्टीचा वार नसतो असे म्हटले जाते. काय आहे कारण ?

नेपाळमध्ये रविवारी सुट्टी का नाही ? सातही दिवस करतात काम लोक ?
facts about nepal
| Updated on: Sep 14, 2025 | 5:04 PM

सर्वसाधारण सर्वजण आठवडाभर काम केल्यानंतर रविवारी आराम करतात. जगातल्या बहुतांश देशात रविवारचा हा दिवस सुट्टीचा दिवस असतो. ज्या दिवशी आठवडाभराचा थकवा दूर केला जातो. आपल्या देशातही शाळा-कॉलेजापासून कार्यालयांना रविवारी सुट्टी दिली जाते. परंतू आपला शेजारी नेपाळ देशात असे होत नाही. नेपाळमध्ये रविवार इतर कामकाजाच्या दिवसांसारखाच असतो, लोक नेहमीप्रमाणे आपआपल्या कामावर जातात.

आपला शेजारील देश अनेक दिवसांपासून जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. याचे कारण आहे येथील Gen Z आंदोलन आहे, ज्यामुळे नेपाळमध्ये सत्तापालट झाला. नेपाळचे अंतरिम पीएम म्हणून सुशीला कार्की यांनी रविवारी पदभार सांभाळला आहे. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. रविवारी येथील कार्यालये सुरु होती आणि सुशीला कुर्की यांनी मुख्यमंत्री पदाचा भार रविवारी सांभाळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चला तर जाणून घेऊयात या मागे कारण काय ? नेपाळमध्ये रविवारी सुट्टी का नाही ?

भारत असो वा अमेरिका आणि ब्रिटनसह युरोपीय देश, प्रत्येक जागी रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरु आहे. परंतू शेजारील देश नेपाळमध्ये असे होत नाही. येथे रविवारपासून नवा आठवडा सुरु होतो. हा सुट्टीचा दिवस असत नाहीत. वास्तविक नेपाळमध्ये साप्ताहिक सुट्टी शनिवारी असते. त्यामुळे सुशीला कार्की यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी शनिवारी नव्हे तर रविवारी पदभार स्वीकारला.

 कधीच गुलाम नव्हता

खूप कमी लोकांना नेपाळबद्दल काही सत्ये माहिती आहेत. नेपाळ जरी छोटा देश असला तर आजपर्यंत कधीच गुलाम नव्हता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतावर हजारो वर्षांपासून परकीय आक्रमण होत आले आहेत. आपल्या देशाने आधी मुघलांची नंतर इंग्रज गुलामी झेलली. या उलट नेपाळ मात्र कायम स्वतंत्र राष्ट्र राहिले आणि त्यांच्या नियमांनुसार चालले आहे. नेपाळच्या लोकांची राष्ट्रीय देवता भगवान पशुपतीनाथ आहेत. जे महादेवाचे रुप आहेत. नेपाळची राजधानी काठमांडू येथे त्यांचे भव्य मंदिर आहे. नेपाळमध्ये गोहत्या केवळ पाप नाही तर तेथे कायद्याने तो गुन्हा मानला जातो आणि यासाठी जेलची शिक्षा आहे.