तीन कोटी मिळताच नवऱ्यालासोडून प्रियकरासोबत पळाली पत्नी, केले दुसरे लग्न

नात्यांपेक्षा कधी कधी पैसा मोठा ठरतो. महिलेला ३ कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. मग लॉटरी जिंकताच तिने पतीला सोडून प्रियकराशी लग्न केले. यामुळेच पैसा नात्यांपेक्षा अधिक महत्वाचा ठरला, असे हा पती म्हणू लागला आहे. या प्रकरणी तो कोर्टातही गेला आहे.

तीन कोटी मिळताच नवऱ्यालासोडून प्रियकरासोबत पळाली पत्नी, केले दुसरे लग्न
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 1:23 PM

बँकॉक : पैसे काही करु शकतो. कारण “सबसे बडा रुपय्या” असे नेहमी म्हटले जाते. या पैशांपुढे काही जण सर्व नाती सोडून देतात. मग एका जीवनाचे नाही तर सात जन्माची गाठ म्हटली जाणारी गाठ सोडतात. मग त्या व्यक्तीचा नात्यांवरील विश्वास उडतो. एका व्यक्तीच्या पत्नीला ३ कोटी रुपये मिळाले. मग २० वर्षाचे नाते सोडून ती प्रियकरासोबत पळून गेली. मग पतीने पोलिसात तक्रार केली अन् न्यायालयात धाव घेतली. आता पोलीससुद्धा या प्रकरणाने चक्रावले आहे.

काय आहे प्रकरण

प्रकरण थायलंडमधील आहे. येथील महिलेला ३ कोटी रुपयांची लॉटरी लागली. ही लॉटरी जिंकताच तिने पतीला सोडून प्रियकराशी लग्न केले. नरिन या ४७ वर्षीय पीडितेच्या पतीने सांगितले की, त्याची माजी पत्नी चौविनने तिला सोडताच तिच्या प्रियकराशी लग्न केले. नरिनने सांगितले की, लग्नाच्या २० वर्षानंतर पत्नी अशी सोडून जाईल यावर विश्वास बसत नाही. माझ्या पत्नीच्या या कृत्यामुळे मी खूप हैराण आणि अस्वस्थ झालो आहे. २० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पत्नी असं करेल असं कधीच वाटलं नव्हतं.

हे सुद्धा वाचा

पत्नीने लपवले लॉटरीचे प्रकरण

नरिन याच्या पत्नीने लॉटरीचे प्रकरण लपवून ठेलवे होते. लॉटरी लागल्याचे तिने सांगितले नाही. परंतु नरिनच्या मुलींनी त्याला ही माहिती दिली. नरिन यांच्या पत्नीने 3 कोटी रुपये जिंकले तेव्हा तो दक्षिण कोरियामध्ये काम करत होता. तो आपल्या देशात थायलंडला परतला जेव्हा कळले की त्याची पत्नी चौविनने दुसऱ्याशी लग्न केले आहे. लॉटरीच्या पैशांबाबतचे प्रकरण कोर्टात पोहोचले असून आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, असे नरिनचे म्हणणे आहे. पोलीस आणि इतर तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. नरिनने लॉटरीच्या अर्ध्या पैशांवर दावा केला आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.