
भारत आणि अमेरिकेमध्ये सोमवारी एक ऐतिहासिक ट्रेड डील झाली. यानंतर व्हाइट हाऊसकडून एक स्टेटमेंट समोर आलय. व्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की, भारत रशियाकडून तेल खरेदी कमी करेल तेव्हाच व्हाइट हाऊस भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटवेल. भारत रशियाकडून तेल खरेदी फक्त कमी करणार नाही, तर पूर्णपणे बंद करेल असा दावा अमेरिकन अधिकाऱ्याने केला. याआधी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिकेत ट्रेड डील झाल्याची घोषणा केली. अमेरिकेने भारतातून येणाऱ्या सामानावर लावलेला 25 टक्क रेसिप्रोकल टॅरिफ घटवून 18 टक्के केला आहे.
आता अशी सुद्धा चर्चा आहे की, अमेरिका लवकरच भारतावर लावलेला 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ हटवेल. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेने भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला. भारतातून अमेरिकेत निर्यात होणार्या सामानावर 50 टक्के टॅरिफ आहे. आता टॅरिफ 18 टक्के झाला म्हणजे 7 टक्के घट याचा अर्थ 43 टक्के टॅरिफ अजूनही काम आहे. रशियाकडून पूर्णपणे तेल खरेदी थांबवल्यानंतरच टॅरिफ फक्त 18 टक्के राहीलं.
#WATCH | Senior White House official to ANI: U.S. will also drop the 25% additional tariff on Indian imports since India reduced purchases of Russian oil. ‘Yes, although the agreement is that India will cease, not just reduce, Russian oil purchases,” the official confirmed… pic.twitter.com/n4w4PBuhNI
— ANI (@ANI) February 2, 2026
तरच भारतावरील टॅरिफ पूर्णपणे हटवला जाईल
अमेरिका भारतावर लावलेला अतिरिक्त 25 टक्के टॅरिफही लवकरच हटवेल असं व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्याने सांगितलं. भारताने रशियाकडून तेल खरेदी पूर्णपणे बंद करण्याच्या दिशेने पाऊल उचललय असा दावा या अधिकाऱ्याने केला. दुसरीकडे या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं की, अमेरिकेचा उद्देश फक्त तेल खरेदी कमी करणं नाही, तर भारताला पूर्णपणे रशियाकडून तेल खरेदी बंद करावी लागेल. अधिकारी म्हणाला की, अशी सहमती झाली तरच अमेरिका भारतावर लावलेला अतिरिक्त टॅरिफ पूर्णपणे हटवेल.