Explainer : ट्रम्प यांचा सल्ला झेलेंस्की मानणार का? रशिया-युक्रेन युद्धाचे पुढे काय होणार ?

रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्नरथ होते. त्यांनी पुतीन यांच्याशी बोलणी केली आणि त्यानंतर आता झेलेंस्की यांच्याशी मुलाखत केली. पुतिन आणि झेलेंस्की आपल्या हट्टावर कायम आहेत. या युद्धाचे पुढे काय होणार आहे ?

Explainer : ट्रम्प यांचा सल्ला झेलेंस्की मानणार का? रशिया-युक्रेन युद्धाचे पुढे काय होणार ?
zelensky, putin and trump
| Updated on: Aug 19, 2025 | 4:06 PM

दोन जागतिक महासत्तांचे प्रमुख यांच्यात अलास्का येथील बैठकीनंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धासंदर्भात अजूनही प्रश्न चिन्ह कायम आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी युक्रेनला सल्ला दिला की त्यांनी रशियाबरोबरचे युद्ध संपवण्यासाठी एक करार करावा, कारण रशिया एक मोठी शक्ती आहे, युक्रेन नाही. या शिखर परिषदेत व्लादिमीर पुतिन यांनी युद्ध संपवण्यासाठी युक्रेनने डोनेटस्क प्रांत   ( donetsk ) द्यायला हवा. परंतू झेलेस्की यांनी ही मागणी फेटाळून लावत आम्ही असे करणार नाही असे म्हटले आहे. दोन्ही देशांचे प्रमुख आपल्या भूमिकेपासून मागे हटायला तयार नाहीत तर ट्रम्प हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पुतीन यांनी मागितला डोनेस्ट्क, झेलेंस्की यांचा नकार ट्रम्प यांच्या बोलताना पुतिन यांनी सांगितले की युक्रेनने डोनबास सोडायला हवे, जे पूर्व युक्रेनच्या डोनेट्स्क आणि लुंगास्क प्रांतानी मिळून बनले आहे. या बदल्यात रशियन सैन्य दक्षिण युक्रेनच्या ब्लॅक सी आयलँड क्षेत्र खेरसॉन आणि झापोरिज्जियातील आपण...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा