विमानात पॅन्ट काढून बसली महिला, काय घडला नेमका प्रकार
Drama in Flight : विमानात एक धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे विमानातील सर्वच प्रवाशांना मोठा धक्का बसला. एक महिला विमानातच पॅन्ट काढून बसली. ती महिला असे का करत आहे? हे कोणाला समजत नव्हते. या प्रकारामुळे एअर हॉस्टेजमध्येही खळबळ माजली आणि सर्व प्रवाशीही त्रस्त झाले होते.

न्यूयार्क दि. 24 नोव्हेंबर | विमान प्रवासात एक विचित्र घटना घडली. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल माडियावर व्हायरल झाला. एक महिला चक्क विमानात पॅन्ट काढून बसली. विमान उडत असताना ती महिला अर्धनग्न होऊन प्रवाशांसमोर येऊन बसली. हा प्रकार पाहून विमानातील सर्वच प्रवाशांना धक्का बसला. परंतु ती महिला असे का करत आहे? हे कोणाला समजत नव्हते. या प्रकारामुळे एअर हॉस्टेजमध्येही खळबळ माजली. त्यांनी विमानातील क्रू मेंबरला या घटनेची माहिती दिली. विमानातील महिला कर्मचारी तिच्यापर्यंत पोहचल्या. त्यांनी तिला पॅन्ट घालण्याची विनंती केली. परंतु बराच वेळ ती महिला पॅन्ट काढूनच बसली होती. हा प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडावरुन फिलाडेल्फियाकडे जाणाऱ्या विमानात घडला.
का केला त्या महिलेने हा प्रकार
सोमवारी फ्रंटीयर एअरलाइन्सच्या विमानात हा प्रकार घडला होता. विमानातील त्या महिलेने अचानक पॅन्ट काढली. विमानाच्या पॅसेजमध्ये लघवी करण्याची धमकी ती देऊ लागली. संपूर्ण विमान प्रवाशांनी भरलेले होते. त्याच वेळी महिलेने पॅन्ट काढून बसली. या प्रकारामुळे सर्व प्रवाशी आवाक झाले. काहींना भीती वाटू लागली. त्या महिलेला शौचालयाचा आता उपयोग करु नका, असे विमानातील एअर हॉस्टेलने सांगितले होते. त्यामुळे तिचा रागाचा पारा चढला आणि तिने विमानातच पॅन्ट काढली.
न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, महिलेने विमानाच्या पॅसेजमध्ये लघवी करण्याचा हट्ट धरला. इतर प्रवाशांनी तिला विरोध केला. त्यानंतर ती त्या प्रवाशांना शिव्या देऊ लागली. बराच वेळा हा गोंधळ सुरु होता. त्यानंतर ती महिला पुन्हा प्लाइट अटेंडेंटला शौचालयात जाऊ देण्याची मागणी करु लागली. त्यानंतर तिला परवानगी देण्यात आली. मग तिने पुन्हा पॅन्ट घातली.
फेसबुकावर त्या महिलेचा व्हिडिओ वोशेल हार्टमॅन यांनी शेअर केला. त्यांनी म्हटले की, मी आणि वोशेल हार्टमॅन प्लोरिडाला जात असताना भयानक अनुभव आम्हाला आला. एक महिला विमानातच पॅन्ट उतरवून बसली. यावेळी सर्व प्रवाशी त्रस्त झाले होते.
