कोरोनाच्या नव्या घातक प्रजातीवर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, युरोपीय देशांना विशेष सूचना

| Updated on: Dec 21, 2020 | 11:15 PM

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (Corona Virua) आढळल्यानंतर संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला आहे (world health organization warning on new corona virus).

कोरोनाच्या नव्या घातक प्रजातीवर जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा, युरोपीय देशांना विशेष सूचना
Follow us on

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (Corona Virua) आढळल्यानंतर संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला आहे. हा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा जास्त घातक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. या नव्या कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग जास्त आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत (world health organization warning on new corona virus).

“कोरोनाच्या या नव्या खतरनाक विषाणू्च्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना करणे जरुरीचं आहे. युरोपीय देशांनी पुन्हा लॉकडाऊन किंवा गर्दीवर कडक निर्बंध घालावे”, अशी सूचना जागतिक आरोग्य संघटेनकडून देण्यात आली आहे (world health organization warning on new corona virus).

कोरोना कुठल्या नव्या रुपात आला?

ब्रिटनमध्ये कोरोनानं पुन्हा कमबॅक केला आहे. कोरोना स्ट्रेन नावानं याला ओळखलं जात आहे. या विषाणूला अद्याप कुठलंही नाव ठेवण्यात आलेलं नाही. मात्र याचा फैलाव कोरोनाहून कित्येक पटीनं अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये यानं पाय पसरायला सुरुवात केली. आता या विषाणूनं आक्राळ-विक्राळ रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. शास्रज्ञांच्या म्हणणानुसार कोरोना विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक प्रमाणात याचा संसर्ग सुरु आहे.

कोरोनाचा नवा विषाणू आणखी घातक आहे का?

ब्रिटनमधील काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या अंदाजनुसार कोरोनाचा नवा विषाणू अधिक वेगाने पसरणारा असू शकतो. मात्र, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. सध्याच्या कोरोना विषाणूपेक्षा नव्या कोरोना विषाणुचा 40 ते 70 टक्क्यांनी जलद प्रसार होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाच्या सध्याच्या लशींची परिणामकारकता कमी होण्याचा धोका आहे.

भारतासाठी हा कोरोना स्ट्रेन डोकेदुखी ठरणार?

ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनमुळं भारताची चिंता वाढली आहे. यामुळंच ब्रिटनहुन येणाऱ्या विमानांवर बंदी घालावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. ICMRच्या संचालकांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नव्या कोरोना स्ट्रेनचा संसर्ग पसरण्याचा दर कोरोनाहून कित्येक पटीनं अधिक आहे. त्यामुळं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. इंग्लडमध्ये सध्या कडक पद्धतीनं कोरोना नियम राबवले जात आहेत.

संबंधित बातम्या : 

कोरोनाचा जीवघेणा अवतार आणि त्याची संपूर्ण माहिती, स्पेशल रिपोर्ट

नव्या कोरोनाच्या बंदोबस्तासाठी मुंबई सज्ज, लंडन रिटर्नवाल्यांची बडदास्त, स्पेशल रिपोर्ट

एकही प्रवासी थेट घरी सोडणार नाही, सक्तीने क्वारंटाईन करणार, BMC आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये