‘ब्रिटेनमध्ये एस्ट्रोजेनेका कोरोना लसीमुळं रक्ताच्या गुठळ्या झाल्याची 25 प्रकरणं’, वाचा जगभरातील 5 मोठ्या बातम्या

| Updated on: Apr 03, 2021 | 2:00 AM

शुक्रवारी जगभरात घडलेल्या प्रमुख पाच घटनांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. याच 5 मोठ्या बातम्यांचा हा थोडक्यात आढावा.

ब्रिटेनमध्ये एस्ट्रोजेनेका कोरोना लसीमुळं रक्ताच्या गुठळ्या झाल्याची 25 प्रकरणं, वाचा जगभरातील 5 मोठ्या बातम्या
Follow us on

लंडन : शुक्रवारचा (2 एप्रिल) दिवस संपूर्ण जगभरासाठीच उलथापालथीचा ठरला. एकीकडे तैवानमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 48 प्रवाशांचा मृत्यू झाला. दुसरीकडे पाकिस्तान सरकारने भारताकडून कापूस विकत न घेण्याचा निर्णय घेतलाय. याशिवाय एस्ट्रोजेनेका कोरोना लसमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने पुन्हा एकदा वादात सापडली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण आणले जात असतानाच कॅनडामधील मॅड काऊ डीसीज या रोगाने जगभरातील देशांची काळजी वाढवली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॉवरोव हे अफगाणिस्तान शांती प्रक्रियेसाठी चर्चा करायला पाकिस्तानमध्ये जाणार आहेत. चला तर मग पाहुयात जगभरातील 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा (Worlds 5 important news of 2 April 2021 including Taiwan railway accident Pakistan Russia, Canada Corona).

1. तैवानमध्ये शुक्रवारी एक रेल्वे बोगद्यातून जात असताना रेल्वे रुळावरून घसरली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात 48 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच 12 प्रवासी गंभीर जखमी झालेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या रेल्वेमध्ये एकूण 409 प्रवासी प्रवास करत होते.

2. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताकडून कापूस खरेदी करण्याच्या निर्णयावर यू टर्न घेतलाय. त्यामुळे पाकिस्तानसह भारतातील कापड उद्योगात नाराजीची भावना आहे. पाकिस्तानमधील कापड उद्योगाचं म्हणणे आहे की आधीच अडचणीत आलेल्या कापड उद्योगासाठी कापसाची अत्यावश्यकता आहे. या निर्णयाने कापड उद्योगाचं मोठं नुकसान होईल.

3. ब्रिटेनमध्ये एस्ट्रोजेनेका कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या झाल्याची 25 प्रकरणं समोर आली आहेत. यानंतर एस्ट्रोजनेका कोरोना लस उत्पादक कंपनी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. या प्रकरणांमुळे कोरोना लसीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न निर्माण झाला आहे.

4. कोरोना विषाणूच्या संकटाशी लढणाऱ्या जगासमोर अजून एक संकट आलं आहे. मॅड काऊ डीसीज या रोगाचा कॅनडामध्ये झपाट्याने प्रसार होत आहे. या रोगामुळे 5 माणसांचा मृत्यू झाला आहे आणि 43 व्यक्तींना याचा संसर्ग झालाय. त्यामुळे जगभरातील देश काळजीत पडले आहेत.

5. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॉवरोव हे अफगाणिस्तानसोबत शांतता प्रक्रियेसाठी चर्चा करण्यासाठी 6 ते 7 एप्रिलला पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावेळी ते पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्यासोबत चर्चा करतील.

हेही वाचा :

Train Derailed in Taiwan:तैवानमध्ये रेल्वे रुळावर ट्रक कोसळला, दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू

Imran Khan : इम्रान खान यांची अवघ्या 24 तासांत पलटी, भारताकडून खरेदीचा ‘तो’ प्रस्ताव रद्द!

Corona Vaccine : Pfizer कडून दिलासादायक बातमी, 12 वर्षांवरील मुलांवरही कोरोना लस परिणामकारक

व्हिडीओ पाहा :

Worlds 5 important news of 2 April 2021 including Taiwan railway accident Pakistan Russia, Canada Corona