Train Derailed in Taiwan:तैवानमध्ये रेल्वे रुळावर ट्रक कोसळला, दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू

Train Derailed in Taiwan: पूर्व तैवानमध्ये रेल्वे रुळावरुन घसरल्यानं 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त रीट्रस या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:43 AM, 2 Apr 2021
Train Derailed in Taiwan:तैवानमध्ये रेल्वे रुळावर ट्रक कोसळला, दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू
तैवानमध्ये रेल्वे दुर्घटना

Train Derailed in Taiwan: तैपेई: तैवानमध्ये रेल्वे दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व तैवानमध्ये रेल्वे रुळावरुन घसरल्यानं 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्त रीट्रस या वृत्तसंस्थेने दिलं आहे. दुर्घटनेत 72 लोक जखमी झाल्याची माहिती वाहतूक मंत्रालयानं दिल्याचं रीट्रसनं म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या विषयी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. (Taiwan train derails 36 peoples died reported by Reuters)

रेल्वे दुर्घटना कशी घडली

तैवानमधील पूर्व तैवानमध्ये रेल्वेलाईनवरील एका पुलावरुन ट्रक रेल्वे रुळावर अचानक कोसळला यामुळे ही दुर्घटना झाल्याची माहिती आहे. य अपघातात रेल्वेचे चार डबे अपघातग्रस्त झाल्याची माहिती, बचावकर्त्यांनी दिली आहे. बोगद्यामध्ये डबे रेल्वे रुळावरुन घसरले यामध्ये 36 जणांचा मृत्यू झाला. ही रेल्वे तैतुंगला जात होती त्यावेळी ह्युलियन प्रांताच्या उत्तर भागात हा अपघात झाला. अपघातग्रस्त रेल्वे अजूनही त्याच बोगद्यात अडकली असल्याची माहिती आहे.

मदतकार्य सुरु

अपघात झालेल्या रेल्वेतून 350 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. त्यापैकी 80 ते 100 लोकांची पहिल्या चार डब्यांमधून सुटका करण्यात आली आहे. तैवानच्या केंद्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ट्रक व्यवस्थित पार्क न केल्यानं तो रेल्वेलाईन वर कोसळला आहे. इतर प्रवाशांची सुटका करण्यासाठी मदतकार्य सुरु आहे.

तैवानमध्ये 2018 मध्येही अशीच दुर्घटना

2018 मध्ये तैवानमध्ये रेल्वे रुळावरुन घसरल्यानं दुर्घटना घडली होती. त्यावेळी 18 प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. उत्तर पूर्व भागात झालेल्या अपघातामध्ये तब्बल 175 जण जखमी झाले होते. 1991 मध्येही पश्चिम तैवानमध्ये रेल्वेच्या अपघातामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 112 लोक जखमी झाले. तैवानमधील हा सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात मानला जात आहे. या अपघाताचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

संबंधित बातम्या:

वादग्रस्त अंपायर्स कॉल निर्णयावर आयसीसीचा मोठा निर्णय, DRS नियमांमध्ये 3 मोठे आणि महत्त्वाचे बदल!

Video : न्यूझीलंडच्या विकेट कीपरची चलाख स्टम्पिंग, क्रिकेट फॅन्सला धोनीची आठवण, एकदा व्हिडीओ पाहाच…


(Taiwan train derails 36 peoples died reported by Reuters)