Suez Canal Blocked : सुएझ कालवा ब्लॉकप्रकरणी भारतीय कर्मचारी अडचणीत, 25 जणांना अटक होणार?

Suez Canal Blocked : सुएझ कालवा ब्लॉकप्रकरणी भारतीय कर्मचारी अडचणीत, 25 जणांना अटक होणार?
सुएझ कालव्यातील जहाज वाहतूक

जागतिक व्यापाराची कोंडी करणाऱ्या सुएझ कालवा ब्लॉकप्रकरणी अडकलेल्या जहाजातील भारतीय कर्मचारी अडचणीत आले आहेत.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Mar 31, 2021 | 6:48 PM

Suez Canal Blocked Indian crew : जागतिक व्यापाराची कोंडी करणाऱ्या सुएझ कालवा ब्लॉकप्रकरणी अडकलेल्या जहाजातील भारतीय कर्मचारी अडचणीत आले आहेत. सुएझ कालव्यातील जागतिक सागरी मार्गच बंद झाल्याने युरोप आणि आशियातील व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे अब्जावधींचं नुकसान झालं. त्यामुळे जहाज कंपनीला दंड ठोठावण्यात आलाय. आता इजिप्त सरकार आणि कालवा प्रशासनाकडून या प्रकरणाची कसून चौकशी होत आहे. या जहाजाच्या चालक पथकात 25 सदस्य भारतीय होते. त्यामुळे या प्रकरणात त्यांनाच बळीचा बकरा बनवलं जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तपासानंतर या भारतीय कर्मचाऱ्यांना अटकही होण्याची शक्यता आहे (Egypt government may take action against Indian crew in Suez Canal Blocked).

या जहाजाने तब्बल एक आठवडाभर सुएझ कालव्यातील सागरी मार्ग ब्लॉक केला होता. अखेर अनेक प्रयत्नांनंतर जहाज काढण्यात यश आलंय. त्यामुळे हा मार्ग सुरु झाला. मात्र, इजिप्तचं तपास पथक या घटनाक्रमाचा खोलवर तपास करत आहे. सुएझ कालवा प्रशासन देखील या प्रकरणात तपास चौकशी करत आहे. या प्रकरणी जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांना नजरकैदेत ठेवलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. यानंतर त्यांना अटकही होण्याची शक्यता आहे.

आधी हवेचा वेग आणि खराब वातावरणामुळे जहाज अडकल्याचं कारण

मागील आठवड्यात सुएझ कालव्यात अडकलेल्या महाकाय जहाजाच्या अपघातात त्यावेळी सुरु असलेलं वेगवान वारं आणि खराब वातावरणाची भूमिका असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, इजिप्त सरकारला तपासात संबंधित अपघात हवेचा वेग किंवा खराब वातावरणामुळे झाला नसल्याचं समजलं आहे. हा अपघात मानवी आणि तांत्रिक चुकीमुळे झाल्याचं समोर आलंय.

जहाजावरील भारतीयांच्या नोकऱ्याही जाण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावरील भारतीय चालकांच्या पथकाला आपल्या पदावरुन हटवले जाण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे या कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचा खटला चालून तुरुंगवास होण्याची भीतीही व्यक्त केली जाच आहे. भारत सरकार आणि भारतीय समुद्री चालक यूनियन याबाबत चिंतीत आहे.

हजारो जहाजांचा मार्ग आठवडाभर बंद

सुएझ कालव्यातून मागील वर्षी हजारो जहाजांनी मालाची वाहतूक केली होती. मागच्या वर्षी या कालव्यातून तब्बल 19 हजार जहाजांनी प्रवास केला. जगातील 10 टक्के व्यापार या कालव्याच्या मार्गातून होतो. विशेष म्हणजे कच्च्या तेलाची वाहतुकीच्या प्रमुख मार्गांपैकी हा मार्ग आहे.

सुएझ कालव्याचं वैशिष्ट्यं काय?

सुएझ कालवा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला जोडतो. हा कालवा 193.3 किलोमीटर लांबीचा आहे. त्याचे बांधकाम 1869 मध्ये झाले. सुएझ कालव्याचं एक टोक उत्तरेला बुर सैद शहराजवळ आहे, तर दक्षिणेकडील टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ आहे.

सुएझ कालव्यामुळे युरोप आणि आशिया या दोन खंडांमधील सागरी वाहतूक कमी वेळेत वेगाने करणं शक्य झालं. सुएझ कालवा सुरु होण्याआधी युरोपातून आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला जवळपास 7000 किलोमीटर लांब वळसा घालून जावं लागायचं. मात्र, हा कालवा झाल्याने हे 7000 किमी अंतर कमी होऊन 193.3 किमी झालं.

हेही वाचा :

Suez Canal : सुएझ कालव्यात अडकलेलं महाकाय जहाज अखेर हटवलं!

Suez canal | सुएझ कालव्यातील जहाज काही निघेना; नेटकरी म्हणतात बाहुबलीला बोलवा, भन्नाट मीम्स व्हायरल

Suez canal: भारतीय चालकाची चूक भोवली अन् ते अवाढव्य जहाज कालव्यात रुतलं?

व्हिडीओ पाहा :

Egypt government may take action against Indian crew in Suez Canal Blocked

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें