Video : न्यूझीलंडच्या विकेट कीपरची चलाख स्टम्पिंग, क्रिकेट फॅन्सला धोनीची आठवण, एकदा व्हिडीओ पाहाच…

Video : न्यूझीलंडच्या विकेट कीपरची चलाख स्टम्पिंग, क्रिकेट फॅन्सला धोनीची आठवण, एकदा व्हिडीओ पाहाच...
New zealand Devon Convey Stumping

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडचा विकेट कीपर डेवॉन कॉनवेने शानदार स्टम्पिंग करत धोनीच्या स्टम्पिंगची आठवण करुन दिली. | New zealand Devon Convey Stumping

Akshay Adhav

|

Apr 02, 2021 | 9:20 AM

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) कॅप्टन म्हणून जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच तो त्याच्या विकेट कीपिंगसाठी प्रसिद्ध आहे. डोळ्याच्या पापण्या लवायच्या आत तो स्टम्प उडवतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला तंबूत जावं लागतं. धोनीच्या याच चलाखपणाचा प्रत्यय अनेक मॅचेसमध्ये आलाय. धोनीच्या स्टम्पिंगने अनेक मॅच फिरल्या आहेत. अशीच धोनीसारखी किंबहुना धोनीच्या स्टम्पिंगची आठवण करुन देणारी स्टम्पिंग न्यूझीलंडचा विकेट कीपर डेवॉन कॉनवे (Devon Convey Stumping) याने केली आहे. त्याच्या चलाखीने बांगलादेशच्या आरिफ हुसेनला तंबूत जावं लागलं. (New zealand Devon Convey Stumping bangaladesh Afif hossain video)

कॉनवेच्या स्टम्पिंगने धोनीची आठवण

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (Ban vs NZ) यांच्यातील तिसऱ्या टी ट्वेन्टी सामन्यात न्यूझीलंडचा विकेट कीपर डेवॉन कॉनवेने शानदार स्टम्पिंग करत धोनीच्या स्टम्पिंगची आठवण करुन दिली. बांगलादेशच्या डावाची सहावी ओव्हर सुरु असताना आफिफ हुसेन मोठा फटका खेळण्याच्या नादात क्रिज सोडण्याच्या प्रयत्नात होता. आफिफचा इरादा कॉनवेने ओळखला. त्याला कॉनवेने पुढे जाऊ दिलं. आणि डोळ्याची पापणी लवायच्या आत त्याने आफिफला स्टम्पिंग केलं. मैदानी अंपायरने हा निर्णय साहजिक थर्ड अंपायरकडे दिला. सगळ्या अँगलन्सनी पाहिल्यानंतर थर्ड अंपायरने बॅट्समनला आऊट घोषित केलं.

पाहा व्हिडीओ :

पावसामुळे 10-10 ओव्हर्सची मॅच

बांगलादेश आणि न्यूझीलंडमध्ये पावसाच्या कारणास्तव 10-10 ओव्हर्सची मॅच खेळवली गेली. बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम बोलिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडच्या फिन एलेनच्या शानदार 71 रन्स ठोकले. त्याच्या बळावर न्यूझीलंडने निर्धारित 10 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 141 रन्स केले. एलेनने केवळ 29 चेंडूत 71 धावा झोडल्या.

न्यूझीलंडकडून बांगलादेशचा सुपडासाफ

न्यूझीलंडने बांगलादेशला 142 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बागलादेशला पेलवलं नाही. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा डाव 9.3 षटकांमध्ये केवळ 76 धावांवर आटोपला. न्यूझीलंडच्या टॉड इस्टेलने 4 विकेट्स मिळवल्या. ही मॅच जिंकत न्यूझीलंडने ट्वेन्टी मालिका 3-0 ने जिंकून बांगलादेशचा सुपडासाफ केला.

(New zealand Devon Convey Stumping bangaladesh Afif hossain video)

हे ही वाचा :

रिषभ पंतसोबत रिलेशनशीपच्या चर्चा, उर्वशी रौतेलाचं खोचक उत्तर

आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला, टी नटराजनला नवी कोरी गाडी भेट!

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलआधी मोठा दिलासा, शाहरुखने सोडला सुटकेचा निश्वास!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें