रिषभ पंतसोबत रिलेशनशीपच्या चर्चा, उर्वशी रौतेलाचं खोचक उत्तर

रिषभ पंतसोबत रिलेशनशीपच्या चर्चा, उर्वशी रौतेलाचं खोचक उत्तर
urvashi Rautela And Rishabh Pant

काही दिवसांपूर्वी रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या अफेअर्सच्या चर्चा मोठ्या जोरात सुरु होत्या. | Urvashi Rautela-Rishabh Pant relationship

Akshay Adhav

|

Apr 02, 2021 | 7:46 AM

मुंबई : भारतीय क्रिकेटचा उभरता खेळाडू ज्याने मागील काही दिवसांपासून आपल्या खेळीने भारतीय संघात एक वेगळा दरारा निर्माण केलाय तो म्हणजे रिषभ पंतने (Rishabh Pant).. स्टम्पच्या पाठीमागून तो बोलतोच बोलतो पण त्याचसोबत तो आपल्या बॅटनेही खूप बोलतो. अशाच बोलक्या रिषभ पंतचे चाहते तरी कसे अबोल असतील. काही दिवसांपूर्वी रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्या अफेअर्सच्या चर्चा मोठ्या जोरात सुरु होत्या. आता खुद्द उर्वशीनेच या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. (Urvashi Rautela Explanation over with Rishabh pant relationship)

मी क्रिकेटर्सला ओळखत नाही

काही दिवसांपूर्वी उर्वशीच्या एका फॅन्सने तिला इन्स्टाग्रामवर तुझा आवडता क्रिकेटर्स कोण आहे?, असा प्रश्न विचारला. त्यावर तिने उत्तर दिलं, मी क्रिकेट अजिबात बघत नाही. त्यामुळे मी क्रिकेटर्सला फारसं ओळखत नाही. असं सांगताना मात्र तिने सचिन सर आणि विराट सर यांचा मी खूप आदर करते, असं सांगायला विसरली नाही.

डेट वर जाताना पंत आणि उर्वशीचे फोटो व्हायरल

रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांना 2019 साली मुंबईच्या जुहूमधील एका हॉटेलमध्ये जाताना काही फॅन्सनी पाहिलं होतं. लेट नाईट डिनरसाठी रिषभ आणि रौतेला हॉटेलमध्ये गेले होते. ज्यानंतर त्यांच्यात खास रिलेशन असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. रौतेला आणि रिषभचे काही फोटोज देखील त्यावेळी व्हायरल झाले होते. यानंतर मीडिया रिपोर्टनुसार, रिषभने कानाला खडा लावत उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं होतं. त्यानंतर त्यांची भेट झाली नाही.

रिषभने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं

रिषभ पंत श्रीलंका दौऱ्यावर होता. मात्र तिथे त्याचा परफॉर्मन्स म्हणावा असा होत नव्हता. त्यामुळे अंतिम 11 मध्ये त्याची जागा फिक्त होत नव्हती. याच टेंशनमधून त्याने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं होतं, अशी चर्चा आहे.

सध्या इशासोबत रिलेशनशीपमध्ये

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत सध्या त्याची मैत्रीण इशा नेगी सोबत रिलेशीपमध्ये आहे. इशा देहरादूनची रहिवासी आहे. तिने इंटेरिअर डिझाइनचं शिक्षण घेतलंय. इन्स्टाग्रामवर ती फारच अॅक्टिव्ह असते. रिषभने तिच्यासोबतचे काही फोटो त्याच्या इन्स्टावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

(Urvashi Rautela Explanation over with Rishabh pant relationship)

हे ही वाचा :

आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला, टी नटराजनला नवी कोरी गाडी भेट!

IPL 2021 : कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलआधी मोठा दिलासा, शाहरुखने सोडला सुटकेचा निश्वास!

IPL 2021 : ‘महामानव चेन्नईत पोहोचला’, आरसीबीचं धमाल ट्विट, आयपीएल गाजवण्यासाठी डिव्हिलियर्स सज्ज!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें