भारतासोबत मैत्री वाढवण्यास चीन उत्सुक, जिनपिंग यांनी म्हटले, ड्रॅगन आणि हत्ती…

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर आहेत. जिनपिंग यांच्यासोबत त्यांची भेट झाली. त्यांनी स्पष्ट म्हटले की, मला नरेंद्र मोदी यांना भेटून खूप जास्त आनंद झाला. यासोबत भारत आणि चीन पुढील काळात मोठी भागिदारी करू शकतात.

भारतासोबत मैत्री वाढवण्यास चीन उत्सुक, जिनपिंग यांनी म्हटले, ड्रॅगन आणि हत्ती...
Narendra Modi Xi Jinping
| Updated on: Aug 31, 2025 | 3:32 PM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दाैऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे देखील चीनमध्ये आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर अनेक देश हे भारताच्या पाठिशी उभे राहताना दिसले. त्यामध्ये अमेरिकेच्या दादागिरी विरोधात भारत, रशिया आणि चीन हे तीन देश एकत्र आली आहेत. विशेष म्हणजे या बैठकीच्या अगोदरच पुतिन यांनी मोठा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांना दिला. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी. जिनपिंग यांच्यात भेट झालीये. दोघांच्या या भेटीकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग सात वर्षांनी एकाच मंचावर दिसले. मोदी आणि शी जिनपिंग यांच्या या भेटीमुळे जागतिक राजकारणात एक नवी खळबळ उडाली आहे. नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग या दोघांमध्ये तब्बल 50 मिनिटे चर्चा झाल्याचीही माहिती मिळतंय. सीमा करार, चांगले संबंध कैलास मानसरोवर आणि व्यापार यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेमध्ये म्हटले की, गेल्या वर्षी आमची कझानमध्ये चर्चा झाली होती. त्यावेळीच्या चर्चेमुळे आमच्यामध्ये एक सकारात्मक दिशा मिळाली. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली आहे आणि दोन्ही देशांमधील थेट विमानसेवा देखील पूर्ववत होत आहेत. पुढे नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, 2.8 अब्ज लोकांच्या हिताशी जोडलेले आहे, जे संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करेल. परस्पर विश्वास, आदर आणि संवेदनशीलतेवर आधारित संबंध विकासात मदत करतील.

शी जिनपिंग यांनी म्हटले की, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खूप जास्त आनंद झाला. चीन आणि भारत या दोन प्राचीन संस्कृती आहेत. आपण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले दोन देश आहोत. दोन्ही देश अत्यंत महत्वाची नक्कीच आहोत. दोन्ही देशांची भागीदारी यशस्वी होईल. ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येत असल्याचे शी जिनपिंग यांनी म्हटले. लोकांच्या कल्याणासाठी आवश्यक सुधारणा घडवून आणण्याची  प्रगतीला चालना देण्याची ऐतिहासिक जबाबदारी आपल्या दोघांवर आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.