AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शत्रू मारले जात आहेत… सीमेवर मोठा भडका, धाडधाड गोळ्यांचा वर्षाव; हुती आणि सौदीने जगाला हादरवलं

येमेनमध्ये हुती बंडखोर आणि सौदी समर्थित सैन्यांमध्ये भीषण युद्ध पेटले आहे. शस्त्रसंधीच्या भंगाने हा संघर्ष अधिक तीव्र झाला असून, दोन्ही बाजूंकडून जोरदार हल्ले सुरू आहेत. हुतींनी सौदीवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले, तर सौदीने हवाई प्रत्युत्तर दिले. या सीमेवरील वाढत्या तणावामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाला असून, परिस्थिती गंभीर बनली आहे.

शत्रू मारले जात आहेत... सीमेवर मोठा भडका, धाडधाड गोळ्यांचा वर्षाव; हुती आणि सौदीने जगाला हादरवलं
huti in yemenImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 16, 2026 | 11:01 AM
Share

यमनमध्ये हुती आणि सौदी समर्थक सैन्यांमध्ये मोठं युद्ध पेटलं आहे. या युद्धाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हुती समर्थक मीडियाने एक व्हिडीओ जारी केला असून त्यात सौदी समर्थित सैन्य एकमेकांविरोधात भिडल्याचं दिसत आहेत. या व्हिडीओत गोळीबार झालेलाही दिसत आहे. शत्रू मारले जात आहेत… असंही हल्लेखोर बोलताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, अल-जौफच्या पूर्वेकडे हे युद्ध झाल्याचा दावा हुतीकडून करण्यात आला आहे. सौदी आणि हुती एकमेकांविरोधात लढत असल्याने संपूर्ण जगाला हादरा बसला आहे.

या व्हिडीओत हल्लेखोरांचं आवाज ऐकायला येत आहे. शत्रूंवर हल्ला करण्यात येत आहे. ऑपरेशन सुरू असलेल्या परिसरात शत्रूला निशाणा बनवण्यात येत आहे, असं या व्हिडीओत म्हटलं जात आहे. मात्र, या व्हिडीओत दिसणारी जागा आणि त्या जागेबाबतचा करण्यात येत असलेला दावा याबाबतची कोणतीही पुष्टी झालेली नाही.

सीजफायरचं उल्लंघन झालं अन्…

यमनमध्ये गेल्या काही दिवसांपासून हुती, सौदी सैन्य आणि सौदी समर्थित यमनी सरकारच्या सैन्याच्या दरम्यान युद्ध सुरू झालं आहे. सीजफायरचं उल्लंघन झाल्यानंतर हे युद्ध अधिकच भडकलं आहे. लाल सागराच्या काही भागावर ताबा मिळवल्याचा दावा हुती बंडखोरांनी केला आहे. यात मोखा बेट आणि अल-मंदेब स्ट्रेट परिसराचाही समावेश आहे.

हुती बंडखोरांनी ग्रेटर आणि लेसल हनीश बेटांवरही ताबा मिळवला आहे. त्यासोबतच सौदीवर तेल पुरवठ्याचा दबाव वाढवण्यासाठी सागरी नाकेबंदी करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून सौदी समर्थित यमनी सैन्याने हुती बंडखोरांविरोधात मोठा पलटवार सुरू केला आहे. ताइज, हज्जाह, लहिज आणि सादा सारख्या परिसरात युद्ध अधिकच भडकलं आहे. यमनी सैन्याने हायसे जिल्ह्यात हुतीकडून काही एरिया परत मिळवल्याचा दावाही केला आहे.

हुतीच्या छावण्यांवर हल्ले

ही लढाई आता यमनच्या सीमेवरून सौदी अरबपर्यंत पोहोचली आहे. सौदीच्या नेतृत्वातील आघाडीने हुतींच्या ठिकाण्यांवर हवाई हल्ले केले आहेत. 24 तासात सौदी अरबकडून 54 हून अधिक हवाई हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात एफ-15 आणि टायफून लढाऊ विमानांचा वापर करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून हुतीने सौदी अरबच्या आत ड्रोन आणि बॅलेस्टिक मिसाईलद्वारे हल्ले केले आहेत. खमिश मुशैतमध्ये किंग खालिद एअर बेसलाही निशाणा बनवल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात सौदी अरबच्या दक्षिण शहरातील 13 नागरिक जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे.

तणाव एवढा वाढला आहे की मक्का आणि जेद्दा सारख्या पवित्र शहरात सुरक्षेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात हुतीच्या एका हल्ल्यानंतर सौदी अरबला ईस्ट वेस्ट ऑयल पाइपलाईन बंद करावी लागली होती. सौदी अरबने या पाइपलाईनच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था