लग्नाला गेली होती तरुणी, पार्टीनंतर अनोळखी मुलासोबत रात्र घालवली, नंतर जे घडले…

जीवनात कोणते वळण कधी येईल हे सांगता येत नाही. अशाच एका तरुणीचे आयुष्यच एका रात्रीने बदलले. त्यानंतर तिच्या जीवनाला असे वळण लागले ज्याची कोणी कल्पनाही केलेली नसेल...

लग्नाला गेली होती तरुणी, पार्टीनंतर अनोळखी मुलासोबत रात्र घालवली, नंतर जे घडले...
| Updated on: Aug 28, 2025 | 10:42 PM

आजकल रिलेशनशिपमध्ये कमिटमेंट असणे मोठी गोष्ट झाली असून प्रत्येक नात्यातला हा महत्वाचा पैलू आहे. लोक केवळ रोमांससाठी एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत आणि नंतर एकमेकांना सोडत आहेत. एका तरुणीने असेच केले, ती एक लग्नात पाहूणी म्हणून गेली, तेथे तिला एक अनोळखी तरुण आवडला. दोघांनी एकत्र रात्र घालवली आणि नंतर जे घडले त्यानंतर तिचे आयुष्यच बदलले

जीवनात अनेकदा अशी वळणं येतात की ज्याची कोणी कल्पना केली नसेल, स्कॉटलंड येथील एक २९ वर्षीय महिला, हॉली फर्थ हीने ( Holly Firth ) केव्हा विचार केला नसेल की अशी वेळ तिच्यावर येईल. हॉली जुलै २०२४ मध्ये एका लग्नसमारंभात सामील झाली होती. तिचे तिची भेट एका व्यक्तीशी झाली आणि दोघांमध्ये वन नाईट स्टँड झाला. दुसऱ्या दिवशी हॉलीने सकाळी आफ्टर पिल देखील घेतली. गर्भधारणा होऊ नये म्हणून तिने काळजी घेतली. परंतू नशीबात काही वेगळंच होतं.

दोन आठवड्यानंतर हॉली हिला कळले की ती गर्भवती आहे. पहिल्या स्कॅनिंगमध्येच कळाले की एका मुलाची आई होणार आहे. परंतू नंतर चाचणीत कळले की ती जुळ्या मुलांना जन्म देत आहे के कळालं.

येथे पोस्ट पाहा –

२७ फेब्रुवारी २०२५ मध्ये हॉलीने दोन गोंडस मुलींना शार्लट (Charlotte) आणि रोझ (Rose) या मुलींना जन्म दिला. तिच्या दोन्ही मुली आरोग्यदायी आहेत. त्यानंतर तिने त्यांना वाढवण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे हॉलीला तिच्या झालेल्या मुलीचा पिता कोण आहे हे आठवतच नाही.टीकटॉकवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत ती मजेने म्हणते की मला जेव्हा लोक विचारत की मुली वडीलांसारख्या दिसतात की नाही ? तेव्हा मी केवल हसत सांगते की मला माहिती नाही, कारण मी त्यांना एकदाच पाहिले होते तेव्हा मी खूप नशेत होते.’

सिंगल मदरहुड

हॉली आता एक सिंगल मदर म्हणून दोन्ही मुलींना वाढवत आहे. ती म्हणते की जीवनाने मला एक मोठे सरप्राईज दिले आहे. परंतू आता मी याला माझे सौभाग्य मानते. ती म्हणते माझा हेतू आई होण्याचा नव्हता. हे सर्व अचानक झाले. परंतू आता मी विचार करते की जर असे झाले नसते तर माझ्याकडे या गोंडस मुली नसत्या. मी त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला इतका आनंद झाला,जेवढा जीवनात कधीच झाला नव्हता.

माझा दरवाजा कायम उघडा

आता मी माझ्या मुलीशिवाय जीवनाची कल्पना करु शकत नाही.आम्ही तिघे एक-मेकांसोबत राहू. हॉलीने सांगितले की तिने आधीही मॉर्निंग आफ्टर पिल खाली होती आणि कधी समस्या झाली नव्हती. परंतू यावेळी समस्या ही झाली की तिची ओव्युलेशन आधीच झाले होते.आणि अशा वेळी औषध कामी येत नाही. हॉलीने मुलींच्या बायोलॉजिकल पित्याशी आतापर्यंत कोणताही संपर्क केलेला नाही, आणि भविष्यातही कदाचित करणार नाही, परंतू त्याला मुलींना भेटाचे असेल तर तिचा दरवाजा नेहमी उघडा असेल असे तिने म्हटले आहे.