
इतिहासाच्या पानांत आजचा, अर्थात 3 मार्चचा दिवस नेहमीच लक्षात राहण्यासारखा आहे. आजच्याच दिवशी शेकडो वर्षांपूर्वी मुघल बादशाह औरंगजेबाच्या क्रूर शासनाचा अंत झाला होता. 3 मार्च 1707 रोजी औरंगजेबाने महाराष्ट्रातच अखेरचा श्वास घेतला. वृद्धत्वामुळे, नैसर्गिक कारणांनी त्याचा मृत्यू झाला. औरंगजेब हा सहावा मुघल सम्राट होता, ज्याने 1658 मध्ये त्याचे वडील शाहजहान यांच्याकडून मुघल साम्राज्य हिसकावून घेतले आणि तो बादशाह बनला. औरंगजेबाला ‘आलमगीर’ या नावानेही ओळखले जायचे. अवघ्या 49 वर्षांच्या कालावधीत औरंगजेबाच्या तीन मुलांचा मृत्यू झाला.
मुघलांचा बादशा, क्रूरकर्मा अशी ओळख असलेल्या औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे 1618 साली झाला होता. तो शाहजहानचा तिसरा मुलगा होता. औरंगजेबाच्या जन्माच्या वेळी शाहजहान हा गुजरातचा सुभेदार होता. मात्र त्यानंतर 1628 साली शाहजहानला सम्राट घोषित केल्यावर औरंगजेब पहिल्यांदा किल्ल्यावर पोहोचला. त्यानंतर 1634 साली औरंगजेबाला पुन्हा दक्षिण जिंकण्यासाठी पाठवण्यात आले.
आजचा दिवस केवळ औरंगजेबाशीच नाही तर अकबराशीही जोडला गेला आहे. मुघल शासनामध्ये सर्वोत्कृष्ट नावं, छबी असलेल्या असलेल्या अकबराने 1575 मध्ये तुकारोईच्या युद्धात बंगाली सैन्याचा पराभव केला. एवढंच नव्हे तर 1938 मध्ये याच ( 3 मार्चच्या) दिवशी जगातील सर्वात वेगवान वाफेचे इंजिन तयार करण्यात आले, ज्याचा वेग ताशी 100 मैलांपेक्षा जास्त होता असे म्हटले जाते. .
आजच्या दिवशीच आणखी काय-काय घडलं जाणून घेऊया.
3 मार्च चा इतिहास
1575 : तुकारोई येथे अकबराने बंगाली सैन्याचा पराभव केला होता.
1707 : मुघल साम्राज्याचा सहावा सम्राट औरंगजेब मरण पावला होता.
1839 : टाटा समूहाचा पाया रचणारे जमशेद जी एन टाटा यांचा जन्म झाला.
1919 : मराठीतील प्रसिद्ध लेखक हरी नारायण आपटे यांचे निधन.
1943 : 21 दिवस उपोषणावर असलेल्या महात्मा गांधींनी याच दिवशी आपले उपोषण संपवले.
1966 : बीबीसीने प्रथमच रंगीत दूरचित्रवाणी प्रसारणाची घोषणा केली होती.
1974 : अकाराहून लंडनला जाणाऱ्या तुर्की एअरलाइन्सच्या विमानाला पॅरिसजवळ अपघात झाला, त्यात विमानातील सर्व 345 लोकांचा मृत्यू झाला.
2005 : स्टीव्ह फॉसेटने 67 तास सतत विमान उडवून पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली होती.
2006 : मुथय्या मुरलीधरनने 100 वा कसोटी सामना खेळताना 1000वी आंतरराष्ट्रीय विकेट घेतली.
2009 : पाकिस्तान दौऱ्यात श्रीलंकेच्या संघावर लाहोरमध्ये हल्ला झाला होता.