तुमच्या घरात जर लहान मुलं आणि पाळीव प्राणी असतील तर ‘ही’ झाडे लावणे टाळा, आरोग्यासाठी असतात धोकादायक
निरोगी जीवनासाठी आपल्या आसपास झाडांची लागवड करणे देखील खूप महत्वाचं आहे. अशातच जर तुमच्या घरी लहान मुलं किंवा पाळीव प्राणी असतील तर ही झाडे लावणे टाळाव्यात. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात की अशी कोणती पाच झाडे आहेत जी घरात अजिबात लावू नये.

आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण योग्य आहार घेत असतो. त्यासोबतच घरातील वातावरण ताजे राहावे यासाठी आपल्यापैकी अनेकजण घरामध्ये वेगवेगळी रोपं व झाडं लावतात. कारण योग्य झाडे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणतात. तसेच काही झाडं ही घरातील सदस्यांमध्ये मानसिक, शारिरिक आरोग्य चांगले ठेवते. पण जर तुमच्या घरात जर लहान मुलं असेल किंवा एखादा पाळीव प्राणी असेल तर घरामध्ये ही झाडं कधीच लावू नका. कारण ही झाडं तुमच्या मुलांच्या आणि पाळीव प्राण्याच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की घरामध्ये कोणती रोपं व झाडं लावू नयेत.
सामान्यतः नागफणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅक्टिसच्या अनेक वेगवेगळ्या जाती आहेत. काही घराबाहेर या झाडांची देखील लागवड केली जाते. विशेषतः लहान कॅक्टिस बहुतेकदा बाल्कनीमध्ये ठेवल्या जातात, परंतु मुले किंवा तुमच्या पाळीव प्राण्यांच्या मांजरी आणि कुत्र्यांचा त्यांच्या संपर्कात आल्यास त्यांना इजा होऊ शकते.
चेरी लॉरेल हे बारमाही फुलांचे रोप आहे. लोकांना चेरी लॉरेल हे झाड त्यांच्या घरातील बागेत लावायला आवडते कारण जेव्हा ते फुलते तेव्हा ते शुद्ध पांढऱ्या गुच्छांमध्ये फुलते आणि बालकनीत एक सुंदर दृश्य दिसते. मात्र हे झाडं लहान मुलांसाठी आणि प्राण्यांसाठी हानिकारक असू शकते. जर या झाडाचे फुल चुकून तुमच्या घरातील प्राण्याने खाल्ले तर त्याने श्वास घेण्यास त्रास आणि जीवघेणी परिस्थिती देखील उद्भवू शकते. जर तुमच्या घरात मुले किंवा पाळीव प्राणी उपस्थित असतील तर हे रोप लावणे टाळा किंवा त्यांच्या आवाक्याबाहेर ठेवा.
ओलिंडर हे झाड घरांमध्ये आणि आजूबाजूला खूप सामान्य आहे. त्याची फुलं पिवळ्या, गुलाबी आणि इतर अनेक रंगांमध्ये उमलतात, परंतु त्याची पाने आणि फळे अत्यंत विषारी असतात. लोक सांधेदुखी, सूज आणि खाज सुटण्यासाठी त्याची पाने वापरतात, परंतु ती खाणे अत्यंत हानिकारक आहे. ते फक्त मलम म्हणून वापरले जाऊ शकते.
लिली फुलाच्या अनेक जाती आहेत, ज्या बारमाही असतात आणि त्यांची सुंदर फुले विशेषतः लोकप्रिय आहेत. म्हणूनच, लोकांना ते घराच्या आसपास व बागेत लावायला खूप आवडतात. परंतु लिलीच झाडं मुलांसाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक असू शकतात. चुकून या रोपांची पाने खाल्ल्याने चिडचिड, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. हे रोप पाळीव प्राण्यांसाठी, विशेषतः मांजरींसाठी खूप हानिकारक मानले जाते.
इंग्लिश आयव्ही ही एक सजावटीची वनस्पती आहे जी सदाहरित आहे. त्याची पाने सुंदर दिसतात, म्हणूनच लोक हे रोपं घरामध्ये लावतात. काही जण भिंती सजवण्यासाठीही लावतात. तथापि जर त्याची पाने आणि बेरी खाल्ल्या गेल्या तर पोटदुखी, अशक्तपणा, जास्त लाळ येणे, उलट्या होणे आणि अतिसार होऊ शकतो. काही लोकांना त्वचेची ॲलर्जी होऊ शकते, म्हणून जर तुमच्याकडे पाळीव प्राणी किंवा लहान मुले असतील तर हे रोपं घरात लावणे टाळा.
आपल्या भारतात धोत्र्याचे फुलांला धार्मिक गोष्टीत खूप महत्व आहे. तसेच महादेवाला देखील हे फुल आणि असेही म्हणतात. तर आपल्यापैकी अनेकजण हे फुल घरातील बागेत लावतात, परंतु हे फुल व त्याचे फळ तुमच्या डोळ्यांसाठी आणि त्वचेच्या जळजळीसाठी अत्यंत धोकादायक असू शकते. तसेच याचे फळ खाल्ल्याने बेशुद्धी, झटके आणि भ्रम निर्माण होऊ शकतात आणि इतर दुष्परिणाम देखील होऊ शकतात. ते इतके विषारी आहे की ते प्राणघातक देखील ठरू शकते. त्यामुळे तुमच्या घराच्या अंगणात किंवा गार्डनमध्ये या प्रकारची झाडे व रोपं लावणे आवश्य टाळा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
