
Bank Holidays Next Week: आजच्या काळात अनेक कामं ऑनलाईन होऊन जातात. पण बरीचशी कामं अशी आहेत, ती ऑनलाईन पूर्ण होणं शक्य नाही… अशाच कामांपैकी एक म्हणजे बँकेतील महत्त्वाचे व्यवहार… बँकेतून पैसे काढणं, पैसे टाकणं आज सोपं झालं आहे. पण बँकेतील अनेक कामे अशी असतात, जी आपल्याला स्वतः करावी लागतात. पण मोठी सुट्टी आली तर, आपली अनेक कामे रखडतात. त्यामुळे तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर उद्या परवाच करुन घ्या… नाहीतर पुढे पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. पण ऑनलाईन बँकींग आणि UPI डिडिटल सेवा सुरु राहणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, 16 ते 22 मार्च 2026 दरम्यान देशातील अनेक भागात बँका एकूण पाच दिवस बंद राहतील. या सुट्ट्यांमध्ये सण तसेच शनिवार आणि रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. पण, या काळात ऑनलाइन बँकिंग आणि UPI सारख्या डिजिटल सेवा कार्यरत राहतील.
17 मार्च रोजी शब-ए-कद्रसाठी सुट्टी – मंगळवार, 17 मार्च रोजी शब-ए-कद्र निमित्त जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील. ही सुट्टी प्रादेशिक पातळीवर लागू केली जाईल, त्यामुळे राज्यातील उर्वरित भागात बँका नेहमीप्रमाणे खुल्या राहतील.
19 मार्च गुढी पाडवा आणि उगादी – 19 मार्च म्हणजे गुरुवारी गुढीपाडवा, उगादी, तेलुगू नवीन वर्ष आणि नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे अनेक शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. नागपूर, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, इम्फाळ, विजयवाडा, श्रीनगर, जम्मू आणि पणजीसह अनेक ठिकाणी बँकिंग सेवा बंद राहतील.
20 आणि 21 मार्च रोजी ईद-उल-फित्रची सुट्टी – ईद-उल-फितर असल्यामुळे कोची, तिरुवनंतपुरम आणि विजयवाडा येथे बँका बंद राहतील. ईदमुळे 21 मार्च, शनिवारी अनेक राज्ये आणि शहरांमध्ये बँकिंग सेवांवरही परिणाम होईल. दिल्ली, मुंबई, कोलकाता, लखनऊ, जयपूर, भोपाळ, पटना आणि चंदीगडसह अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. तर 22 मार्च रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील.
या पाच दिवसांमध्ये अनेक शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत, पण ऑनलाइन बँकिंग, मोबाइल बँकिंग, यूपीआय आणि एटीएम सेवा नेहमीप्रमाणे उपलब्ध राहतील. ग्राहक या डिजिटल माध्यमांद्वारे पैशांचे व्यवहार करु शकतील… पण सिस्टम देखभालीमुळे सेवा कधीकधी तात्पुरत्या स्वरूपात विस्कळीत होऊ शकतात.