AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या महापौर लाल दिव्यात अडकल्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत गाडीला लावण्यात आलेल्या लाल आणि निळ्या दिव्यावरुन सुरु असलेल्या वादावर वक्तव्य केले आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...

मुंबईच्या महापौर लाल दिव्यात अडकल्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?
देवेंद्र फडणवीसImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 15, 2026 | 1:00 PM
Share

मुंबई महापालिकेच्या (BMC) नवनिर्वाचित महापौर रितू तावडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या नव्या अधिकृत गाडीवर लावलेल्या लाल आणि निळ्या दिव्यांमुळे सध्या सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने २०१७ मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा, नामफलक, ध्वज किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास बंदी घातली होती. त्यानंतर आता रितू तावडे यांच्या गाडीला लावलेले लाल-निळे दिवे पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आह.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी त्याची माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर वैगरे नव्हता. पण बोनेटच्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यामध्ये महापौरांचा काहीच दोष नाहीये. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरु नयेत हा जुनाच आपला नियम आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असे वाटतय की त्यांना विनाकारण टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणे योग्य नाही.”

नेमकं प्रकरण काय?

नव्या महापौर रितू तावडे यांच्या नव्या इनोव्हा गाडीवर छतावर दिवे नसले तरी समोरच्या भागात (फ्रंट ग्रिल किंवा बंपरजवळ) लाल आणि निळे फ्लॅशिंग दिवे बसवलेले दिसत आहेत. तसेच त्यांच्या ताफ्यातील एक स्कॉर्पिओ गाडीवरही पोलिस वाहनांसारखे लाल-निळे दिवे लावलेले आहेत. यामुळे व्हीआयपी संस्कृती पुन्हा सुरू झाल्याची चर्चा सुरु आहे. त्यांच्या गाडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केला संताप

मिसुद्धा महापौर राहिलेली आहे मला जे नियम सांगण्यात आलेले होते त्यानुसार मी त्याचे प्रोटोकॉल पाळले होते.मी महापौर असताना फॅमिलीसाठी असणारी गाडी नाकारली होती. प्रोटोकॉल विचारून महापौरानी माहिती घेतली नाही का ? कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही दिव्याची गाडी वापरली ? मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेल्या बदल्यांचे आदेश काढण्याचे अधिकार तुम्हाला आहेत का ? तुम्ही म्हणताय आधीच्या महापौर कधीच दिसल्या नाहीत ? तुम्हाला काम करणाऱ्या महापौर कशा दिसतील असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर