59 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची डिमार्टमध्ये मोठी तोबा गर्दी, 5 ते 6..

डिमार्टमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. डिमार्टमध्ये कोणत्याही वेळी गेले तरीही प्रचंड गर्दी बघायला मिळते. त्यामध्येच डिमार्टकडून एक खास सवलत ग्राहकांना दिली जातंय. हे खरेदी करण्यासाठी ग्राहक सकाळीच डिमार्टमध्ये मोठी गर्दी करत आहेत.

59 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची डिमार्टमध्ये मोठी तोबा गर्दी, 5 ते 6..
Crowd D Mart
| Updated on: Aug 08, 2026 | 4:32 PM

महागाईच्या काळात अधिक बचत कशी करता येईल, यावर सर्वांचा भर असतो. दहा दहा रूपये वाचवण्यासाठी प्रयत्न केली जातात. त्यातच महिन्याचा किराणा भरायचा असेल तर सर्वाधिक बचत कुठे होते ते म्हणजे डिमार्टमध्ये. जर तुम्ही डिमार्टमध्ये जाऊन खरेदी केली तर पैशांची अधिक बचत होते. तिथे एका वर एक वस्तू फ्रीमध्ये मिळतात. यासोबत एमआरपीपेक्षा कितीतरी जास्त पट स्वस्तामध्ये वस्तूही आपल्याला मिळतात. एकाच छताखाली मोठ्या प्रमााणात आपण खरेदी करू शकतो, शिवाय पैशांची बचतही होते. कोणताही सणवार असो डिमार्टमध्ये त्या संदर्भातील वस्तूही आपल्याला मिळतात. उदाहरणार्थ आता राखीपाैर्णिमा आहे. यादरम्यान डिमार्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बघायला मिळत आहेत. प्रत्येक सणावाऱ्यांचे साहित्य आपल्याला डिमार्टमध्ये मिळते.

राख्यापेक्षा डिमार्टमध्ये मोठी गर्दी ग्राहकांनी एका 59 रूपयांच्या वस्तूसाठी केलीये. मोठी गर्दी ग्राहकांची 59 रूपयांची वस्तू घेण्यासाठी झाली.  महिला तर या वस्तूवर तुटून पडल्या आहेत. बाहेर जर आपण ही वस्तू घेण्यासाठी गेलो तर 200 पेक्षा अधिक पैसे आपल्याला मोजावी लागतील. मात्र, डिमार्टमध्ये ही वस्तू फक्त आणि फक्त 59 मध्ये मिळतंय.

विशेष म्हणजे तो एक सेट असून सेम 3 गोष्टी मिळत आहेत. डिमार्टमध्ये 59 चे डब्बे घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली. एकाच सेटमध्ये तीन डब्बे मिळत आहेत. शिवाय ते मोठेही आहे. किचनमधील कोणतीही वस्तू त्यात ठेऊ शकतो. फक्त किचनच नाही तर त्यात काहीही कामाची वस्तू ठेवली जाऊ शकते. या डब्ब्यांची प्रचंड मागणी आहे.

हेच नाही तर एक ग्राहक हे तीन ते चार सेट विकत घेत आहेत .अनेक डिमार्टमध्ये हे डब्बे संपले देखील आहे. ग्राहक सकाळीच हे डब्बे खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये पोहोचत आहेत. उशीर झाल्यानंतर हे डब्बे मिळत नसल्याने हे डब्बे खरेदी करण्यासाठी सकाळीच ग्राहक मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. D-Mart ने दैनंदिन वापरातील अनेक किराणा आणि घरगुती वस्तूंवर आकर्षक सवलत दिल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us