
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबाची चर्चा होते, तेव्हा अंबानी (Ambani Family) कुटुंबाचं नाव येणार नाही असं तर होत नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून ते आणि त्यांचं कुटुंब हे नेहमी स्पॉटलाइटमध्ये असतात. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात त्यांची लाइफस्टाइल, शाही अंदाज आणि प्रचंड संपत्तीचं उदाहरण दिलं जातं, ते नेहमीच चर्चेंच्या केंद्रस्थानी असतात. अनंत अंबानीचे लग्न असो, सोशल इव्हेंटमध्ये नीता अंबानीची उपस्थिती असो किंवा अँटिलियामध्ये आयोजित केलेल्या भव्य पार्ट्या असोत, अंबानी कुटुंबांचं नाव सर्वांच्याच तोंडी असतं. पण या अत्यंत श्रीमंत कुटुंबाचा रोजचा,दैनंदिन खर्च किती असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल पण अंबानी कुटुंब एका दिवसात जितका पैसा खर्च करतं, त्या रकमेतून अनेक छोटे व्यवसाय एका महिना तरी सहज चालवता येतील. चला तर मग जाणून घेऊया अंबानी कुटुंबाचा खर्च..
एका दिवसात किती पैसे खर्च करतं अंबानी कुटुंब ?
मीडिया रिपोर्ट्स आणि एक्सपर्ट्सच्या अंदाजानुसार, अंबानी कुटुंबाचा मासिक वैयक्तिक खर्च (Personal expense) 30 ते 60 कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. पण, अंबानी कुटुंब दररोज किती पैसे खर्च करतं याचा अधिकृत आकडा उपलब्ध नाही. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार, त्यांचा रोजचा खर्च कोट्यवधी रुपये असू शकतो. तसं पहायला गेलं तर, अंबानी कुटुंबाचा दैनंदिन खर्च अनेक गोष्टींवर अवलंबून असतो.
1. अँटीलियाचा खर्च : मुकेश अंबानी त्यांच्या कुटुंबासह अँटिलियामध्ये राहतात, जे जगातील सर्वात महागड्या खाजगी घरांपैकी एक आहे. मुंबईतील सर्वात श्रीमंत भागात वसलेल्या या 27 मजली इमारतीत तुम्ही कल्पना करू शकता अशा सर्व गोष्टी आहेत, ज्यात हेलिपॅड, खाजगी थिएटर, बॉलरूम, तापमान नियंत्रित स्विमिंग पूल आणि अगदी बर्फाने झाकलेली कृत्रिम भिंत देखील समाविष्ट आहे. तिथे 600 हून अधिक लोक काम करतात, ज्यांचे वेतन दरमहा सुमारे 12 कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. घराची स्वच्छता, वीज, पाणी, देखभाल आणि इतर सुविधा जोडल्या तर केवळ अँटिलियाचा मासिक खर्च 15 ते 20 कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो, म्हणजेच केवळ घराच्या देखभालीचा दररोजचा खर्च 50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
2. कपडे आणि दागिन्यांचा खर्च : नीता अंबानी आणि त्यांची मुलं लक्झरी ब्रँड आणि डिझायनर कपड्यांवरील प्रेमासाठी प्रसिद्ध आहेत. दागिन्यांबद्दल बोलायचे झाले तर, नीता अंबानी यांनी त्यांची मुलगी ईशा आणि सून श्लोकाला वारंवार शेकडो कोटींचे दागिने भेट म्हणून दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानी कुटुंब फक्त कपडे आणि दागिन्यांवर दरमहा 3 ते 5 कोटी रुपये खर्च करतं.
3. ट्रॅव्हल आणि प्रायव्हेट जेट : अंबानी कुटुंबाकडे अनेक खाजगी जेट आहेत, जी प्रवास आणि व्यावसायिक मीटिंगसाठी वापरले जातात. या जेट विमानांच्या देखभालीचा आणि इंधनाचा खर्च दरमहा 5 ते 10 कोटी रुपयांपर्यंत असतो. याव्यतिरिक्त, आंतरराष्ट्रीय सहली, आलिशान हॉटेल्समध्ये राहणं, सुरक्षा आणि शाही स्वागत यासह दैनंदिन खर्च सहजपणे 20 ते 30 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
4. सिक्युरिटी आणि आदरातिथ्य : अंबानी कुटुंबाची सुरक्षा एका फुल-प्रूफ सिस्टमद्वारे राखली जाते. देशातील सर्वोत्तम सुरक्षा एजन्सी आणि खाजगी रक्षकांची फौज त्यांच्यासोबत असते. रिपोर्ट्सनुसार, दरमहा 2 ते 4कोटी रुपये केवळ सुरक्षेवर खर्च केले जातात. शिवाय, जेव्हा पार्ट्या आयोजित केल्या जातात तेव्हा आंतरराष्ट्रीय नियोजक, सजावट आणि पाहुण्यांच्या आदरातिथ्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. अनेकदा पार्टीजचा खर्च हाँ 50 लाखांपासून ते 10 कोटींपर्यंत जाऊ शकतो.