Jio, Airtel व Vi चे मोबाईल रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग सर्व्हिसेस किती दिवस सक्रिय राहते? जाणून घ्या

अनेकदा असे घडते की मोबाईल रिचार्जची मुदत संपल्यानंतर लगेचच इनकमिंग सर्व्हिसेस बंद होतात. या लेखात रिचार्जची मुदत संपल्यानंतर कोणत्या कंपन्यांच्या इनकमिंग सर्व्हिसेस किती दिवस सक्रिय राहतात, हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

Jio, Airtel व Vi चे मोबाईल रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग सर्व्हिसेस किती दिवस सक्रिय राहते? जाणून घ्या
Mobile recharge
| Updated on: Aug 19, 2026 | 7:54 PM

स्नेहल मेंगळ: आजच्या काळात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र याच मोबाईल फोनमध्ये जेव्हा रिचार्जची वैधता संपते तेव्हा अनेकदा आउटगोइंग कॉल, डेटा किंवा इतर सेवा बंद होतात. अशावेळी रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग कॉल किती दिवस सुरू राहतात? हा प्रश्न अनेकांना पडतो. सर्वसाधारणपणे भारतात रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) या तीन प्रमुख दूरसंचार कंपन्या कार्यरत आहेत. तर या तिन्ही कंपन्यांचे इनकमिंग कॉल सेवेसंदर्भात खूप वेगवेगळे नियम आहेत. चला तर मग आजच्या लेखात कोणत्या कंपनीचा इनकमिंग कॉल सर्व्हिस किती दिवस सुरू राहते ते जाणून घेऊयात.

रिलायन्स जिओ इनकमिंग सर्व्हिस

जिओ टेलिकॉम कंपनी रिचार्ज संपल्यानंतरही 90 दिवसांपर्यंत इनकमिंग कॉल्स सुरू राहतात. यासाठी एकच अट आहे की तुमचे सिम सतत नेटवर्कशी जोडलेले राहिले पाहिजे.

भारती एअरटेल

एअरटेल सिम वापरकर्त्यांना रिचार्ज प्लॅनची ​​मुदत संपताच नियम खूप कडक होतात. रिचार्ज न केल्यास, केवळ 48 तासांत इनकमिंग सर्व्हिस
सेवा थांबवली जाते.

व्‍होडाफोन-आयडिया (Vi)

एअरटेलप्रमाणेच व्होडाफोन-आयडिया ही टेलिकॉम कंपनी देखील रिचार्ज संपल्यावर तुम्ही रिचार्ज केला नाही तर 48 तासांनंतर तुमचे येणारे इनकमिंग सर्व्हिस सेवा थांबवली जाते. आणि ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला नवीन प्लॅनचा रिचार्ज करावा लागेल.

सिम बंद होण्याचे नियम

रिचार्जची वैधता संपल्यानंतरही तुम्ही बराच काळ कोणताही नवीन प्लॅन सक्रिय केला नाही किंवा सिमचा वापर केला नाही, तर तुमचा मोबाइल नंबर निष्क्रिय होण्याची शक्यता असते. TRAIच्या नियमांनुसार केवळ non-usage मुळे प्रीपेड मोबाइल कनेक्शन किमान 90 दिवसांपूर्वी निष्क्रिय करता येत नाही. त्यानंतर ऑपरेटरच्या लागू नियमांनुसार नंबर deactive होऊ शकतो आणि पुढील प्रक्रियेनुसार तो कायमचा बंद होण्याची शक्यता असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us