PPF Scheme: पीपीएफमध्ये रोज 405 रुपये गुंतवणूक करुन बनता येईल करोडपती

PPF Scheme: योजनेची मुदत 15 वर्ष आहे. परंतु तत्काळ गरज म्हणून 15 टक्के रक्कम पीपीएफ खात्यातून काढता येते. परंतु त्यासाठी पीपीएफ खाते उघडून सहा वर्ष पूर्ण झाली पाहिजे. पीपीएफ खाते उघडल्यावर तीन वर्ष ते सहा वर्षापर्यंत त्याच्यावर कर्ज घेता येते. जमा रक्कमेवर 25 टक्के कर्ज मिळते. कर्जावर PPF व्याजदरापेक्षा 2% जास्त व्याज द्यावे लागतो.

PPF Scheme: पीपीएफमध्ये रोज 405 रुपये गुंतवणूक करुन बनता येईल करोडपती
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 3:43 PM

नवी दिल्ली | दि. 28 फेब्रुवारी 2024 : गुंतवणुकीचे विविध माध्यमे उपलब्ध आहेत. त्यात सर्वात सुरक्षित माध्यम म्हणून सरकारी योजना पब्लिक प्राव्हिडेंट फंड (Public Provident Fund) ओळखली जाते. PPF ही सर्वात प्रसिद्ध गुंतवणूक योजना आहे. या योजनेतील पैसे पूर्ण सुरक्षित असतात. कारण केंद्र सरकारची त्याला ग्यारंटी आहे. पीपीएफमध्ये वर्षाचे 500 रुपये गुंतवणूक तुम्ही करु शकतात. तसेच एका वर्षांत जास्तीत जास्त गुंतवणुकीस मर्यादा आहे. ही मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. एका आर्थिक वर्षांत 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास त्याला व्याज मिळत नाही. पीपीएफमध्ये गुंतवणूक दरवर्षी एकाच वेळी किंवा टप्प्या टप्प्याने करता येते.

PPF वर किती व्याज मिळते?

बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposite) पब्लिक प्रोव्हिडेंट फंडमध्ये व्याज जास्त मिळते. दरवर्षी केंद्र सरकारकडून PPF व्याजदर निश्चित केले जातात. सध्या सरकार या योजनेवर 7.1 टक्के व्याज देत आहेत. योजनेतील व्याज चक्रवाढ व्याज पद्धतीने मिळते. दरवर्षी मार्च महिन्यात तुमच्या खात्यावर व्याज दिले जाते. दर तीन महिन्यांनी व्याजासंदर्भात पुनरावलोकन केले जाते. त्यावर अंतिम निर्णय अर्थमंत्रालयाचा असतो.

PPF मुळे करात मिळते सुट

कर बचतीसाठी ही सर्वोत्तम योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करुन दुहेरी लाभ घेता येतो. आयकरात सुट आणि व्याजसुद्ध मिळत असल्यामुळे नोकरदार वर्गात ही लोकप्रिय योजना आहे. योजनेत आयकर कलम 80C नुसार जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत सुट मिळू शकते. तसेच पीपीएफ योजना पूर्ण झाल्यावर जी रक्कम असते तिच्यावर कोणताही कर लागत नाही. ही योजना 15 वर्षांसाठी असते. मॅच्‍योरिटी योजना आणखी 5-5 वर्ष सुरु ठेवता येते. परंतु त्यासाठी एका वर्षापूर्वी अर्ज करणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

PPF मधून कधी पैसे काढता येतात

योजनेची मुदत 15 वर्ष आहे. परंतु तत्काळ गरज म्हणून 15 टक्के रक्कम पीपीएफ खात्यातून काढता येते. परंतु त्यासाठी पीपीएफ खाते उघडून सहा वर्ष पूर्ण झाली पाहिजे. पीपीएफ खाते उघडल्यावर तीन वर्ष ते सहा वर्षापर्यंत त्याच्यावर कर्ज घेता येते. जमा रक्कमेवर 25 टक्के कर्ज मिळते. कर्जावर PPF व्याजदरापेक्षा 2% जास्त व्याज द्यावे लागतो.

PPF मध्ये करोडपती कसे बनता येईल

पीपीएफ खात्यात गुंतवणूक करुन तुम्ही कोट्यधीश होऊ शकतात. यासंदर्भात फॉर्मूला खूप सोपा आहे. रोज केवळ 405 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. म्हणजे वर्षाची गुंतवणूक 1,47,850 रुपये होते. एकूण 25 वर्ष ही गुंतवणूक सुरु ठेवली तर सध्याच्या व्याजदर 7.1% नुसार 1 कोटी रुपये होतात.

वांद्रे आता सुरक्षित नाही, काय म्हणाले झिशान सिद्दीकी ?
वांद्रे आता सुरक्षित नाही, काय म्हणाले झिशान सिद्दीकी ?.
'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ
'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ.
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड...
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड....
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या.
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं
सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं.
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर
लाडक्या बहिणींनो मोठी बातमी, 2100 कधीपासून मिळणार? सर्वात अपडेट समोर.
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार
राईटहँड कराड दरबारातून तुरुंगात; मुंडेंना स्वत: घ्यावा लागला जनतादरबार.
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा
'..तेव्हा का नाही पकडलं', 'त्या' आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा.
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर
VIDEO : सैफच्या पाठीत खुपसलेला चाकूच्या तुकड्याचा हादरवणारा फोटो समोर.
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?
बीड प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होणार? बंद दाराआड काय चर्चा?.