तुम्ही अजून जमा केली नाही गुलाबी ₹ 2000 रुपयांची नोट? चलनबाद नोटांवर आरबीआयची मोठी अपडेट, पाहा काय

९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत लोकांकडून आणि संस्थांकडून आरबीआयच्या कार्यालयात नोटा जमा करण्यात आल्या. २००० रुपयांच्या नोटा बँकांत स्वीकारल्या जातात.देशात देखील भारतीय डाक कार्यालयातून २००० रुपयांच्या नोटा आरबीआयच्या कोणत्याही स्थानिक कार्यालयात पाठवू शकतात. हा पैसा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.

तुम्ही अजून जमा केली नाही गुलाबी ₹ 2000 रुपयांची नोट? चलनबाद नोटांवर आरबीआयची मोठी अपडेट, पाहा काय
दोन हजारांच्या नोटेचे काय गौडबंगाल
| Updated on: May 02, 2025 | 5:43 PM

गुलाबी रंगाची दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद होऊन दोन वर्षे झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ( RBI ) यावर मोठी अपडेट दिली आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की या नोटांना चलनातून मागे घेतल्यानंतर दोन वर्षांनंतरही ६,२६६ कोटी रुपयांच्या नोट अजूनही बाजारात आहेत अशी माहीती आता आरबीआयच्या आकडेवारीमुळे उघड झाली आहे. दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही व्यवहारात आहेत. आरबीआयने १९ मे २०२३ रोजी २००० रुपये मुल्यांच्या नोटा चलनातून हटविण्याची घोषणा केली होती. आरबीआयने शुक्रवारी सांगितले की ३० एप्रिल २०२५ च्या स्थितीनुसार सध्या दोन हजार रुपयांच्या एकूण ६,२६६ कोटी रुपये मुल्यांच्या नोटा बाजारात आहेत.

१९ मे २०२३ रोजीच्या स्थितीनुसार त्याकाळात चलनात २००० रुपयांच्या बँक नोटांचे एकूण मुल्य ३.५६ लाख कोटी रुपये होते. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की या प्रकारे १९ मे २०२३ पर्यंत चलनात असलेल्या २००० रुपयांच्या ९८.२४ टक्के बँक नोटा परत आलेल्या आहेत.

ऑक्टोबर 2023 नोटा परत करण्याची होती तारीख

दोन हजार रुपयांच्या नोटांना जमा करणे किंवा बदलण्याची सुविधा ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत देशातील सर्व बँक शाखांमध्ये होती.चलनातून २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा १९ मे २०२३ पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात सुरु होती.

आरबीआयच्या कार्यालयात ९ ऑक्टोबर २०२३ पासून लोकांकडून आणि संस्थांकडून बँक खात्यात जमा करण्यासाठी २००० रुपयांच्या नोटा बँक स्वीकारत आहे.देशात देखील भारतीय डाक कार्यालयातून २००० रुपयांच्या नोटा आरबीआयच्या कोणत्याही स्थानिक कार्यालयात पाठवू शकतात. हा पैसा त्यांच्या बँक खात्यात केला जातो.