Knowledge : चालवा डोकं… हॉटेलच्या बेडवर का पसरवतात कापडाचा तुकडा ? नाव तरी माहीत आहे का ?
हॉटेलमधील बेडवर दिसणारा कापडाचा तुकडा, केवळ सौंदर्यासाठी नसतो. हा बेडला आलिशान लूक देण्यासोबतच चादरी आणि गादीला डागांपासून वाचवतो. पाहुण्यांना उच्च दर्जाची सेवा मिळाल्याचा अनुभव देण्यासाठीही याचा उपयोग होतो. हॉटेलची स्वच्छता आणि पाहुण्यांच्या सोयीसाठी बेड रनर महत्त्वाचा ठरतो, ज्यामुळे त्यांची हॉटेल्समधील ट्रिप आरामदायक बनते.

आपण कधी ना कदी ट्रीपसाठी, बाहेर फिरायला जातो. तेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये चेकइन करून आपण रिलॅक्स व्हायला रूमममध्ये थांबतो. तुम्हीही कधी ना कधी हॉटेलची एखादी रूम बूक केली असेलच ना. या हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या किमतीच्या वेगवेगळ्या खोल्या असतात. म्हणून, जेव्हा आपण हॉटेलमध्ये राहतो तेव्हा आजूबाजूला पाहतो, बेडशीटपासून ते वॉर्डरोबपर्यंत सर्वकाही तपासून घेतो. पण हॉटेल रूममध्य असलेल्या बेडच्या बेडशीट किंवा ब्लँकेटवर कापडाचा तुकडा का ठेवला जातो तुम्ही कधी विचार केला आहे का की ? तुम्हालाही बेडवर हा तुकडा बऱ्याचदा दिसला असेल, कधी पांढरा तर कधी वेगवेगळ्या रंगांमध्येही. पण त्याचा उद्देश किंवा उपयोग काय,याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? चला आज यामागचं कारण जाणूनच घेऊया.
बेडवर का घालतात हे कापड ?
हॉटेलच्या बेडवरील बेडशीटवर ठेवलेला किंवा अंथरलेला कापडाचा तुकडा, त्याचा एक विशेष उद्देश असतो. त्याला bed runner किंवा bed scarf असं म्हटलं जातं.
आलिशान लूकसाठी ठेवतात बेड रनर
कापडाचा हा तुकडा किंवा बेड रनर यामुळे त्या बेडचे सौंदर्य वाढतं, ज्यामुळे खोली अधिक आकर्षक बनते. बेड रनर्स हे खोलीच्या थीमशी जुळणारे विविध रंग आणि डिझाइनमध्ये उपलब्ध असतात. यामुळे बेडला एक प्रीमियम आणि आलिशान लूक मिळतो.
Knowledge : 1, 2 किंवा 10 रुपयांची नाणी नेहमी गोलच का असतात ? कोणाला माहित्ये उत्तर ?
स्वच्छता आणि सुरक्षा
हे कापड बेडच्या डोक्यावर किंवा तळाशी ठेवले जाते जेणेकरून गादी किंवा चादरी यांचे घाण आणि डागांपासून संरक्षण होईल. यामुळे हॉटेलचे बेड अधिक स्वच्छ आणि स्वच्छ दिसण्यास मदत होते. तसेच, त्यामुळे हॉटेलमधील पाहुण्यांचे कपडे आणि सामान घाणेरडे होण्यापासून देखील वाचवते. म्हणजे तर एखाद्या व्यक्तीने त्याची बॅग किंवा कपडे बेडवर ठेवले तर गादी किंवा चादरीचा त्याच्याशी थेट संपर्क होत नाही आणि ते (कपडे) मळत नाहीत.

Knowledge : ट्रेन आणि बस प्रमाणे विमानालाही असतो का हॉर्न ? कोणाकोणाला माहीत्ये हे उत्तर ?
पाहुण्यांना खास वाटावं म्हणूनही उपयोग
बेड रनरचा उपयोग काय असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ही एक कॉमन गोष्ट आहे. त्यामुळे हॉटेलमधील पाहुण्यांना हाय लेव्हल सेवा आणि सुविधा मिळाल्यासारखं वाटतं. हॉटेलला आपल्या पाहुण्यांच्या आराम आणि सोयीची काळजी आहे, हेही त्यातून दिसून येतं.
बेड रनर म्हणजे काय ?
बेड रनर हा एक रुंदीने लहान पण लांबीने मोठा असा कापडाचा तुकडा असतो, जो बेडशीटच्या वर घाताला दातो. बहुतेकवेळा बेड रनर हे टॉप-क्लास हॉटेल्समध्ये दिसतात.
