
प्राइवेट जेट म्हणजे लक्झरी, स्टेटस, स्वातंत्र्य आणि वैभवाचं प्रतीक. सेलिब्रिटी, उद्योगपती आणि बड्या लोकांकडे स्वतःचे जेट असणं हे त्यांच्या यशाचं आणि आर्थिक सामर्थ्याचं लक्षण मानलं जातं. पण खरंच एक प्रायव्हेट जेट घेण्यासाठी किती पैसे लागतात? केवळ विमान खरेदी करणं म्हणजेच सगळं झालं असं समजणं चुकीचं ठरेल. कारण त्याचा मेंटेनन्स, क्रू, इंधन, विमानतळ शुल्क, विमा आणि इतर खर्च हे एकदम प्रचंड असतात.
प्रायव्हेट जेटचे दर अनेक गोष्टींवर अवलंबून असतात जसं की जेटचं साइज, त्याचा मॉडेल, बनवलेले वर्ष, फिचर्स आणि किती लांब उडू शकतो यावर.
1. लाइट जेट (4-7 प्रवासी): Cessna Citation CJ3 किंवा Embraer Phenom 300 सारखी विमाने $3 ते $9 मिलियन (सुमारे ₹25 ते ₹75 कोटी) मध्ये येतात.
2. मिड-साइज जेट (8-12 प्रवासी): Bombardier Challenger 350 किंवा Embraer Praetor 600 यांसारखी जेट्स $9 ते $20 मिलियन (₹75 कोटी ते ₹165 कोटी) मध्ये मिळतात.
3. लार्ज जेट (12-19 प्रवासी): Gulfstream G650, Bombardier Global 7500 सारखी प्रिमियम जेट्स $25 ते $75 मिलियन (₹200 कोटी ते ₹625 कोटी) पर्यंत जातात.
4. अल्ट्रा-लक्झरी VIP जेट (Boeing, Airbus कन्व्हर्टेड): हे जेट्स $100 मिलियन (₹800 कोटी) पेक्षा जास्त किमतीचे असतात.
1. लाइट जेट: वार्षिक मेंटेनन्स $5 लाख ते $10 लाख (₹4 ते ₹8 कोटी).
2. मिड-साइज जेट: $10 लाख ते $20 लाख (₹8 ते ₹16 कोटी)
3, लार्ज जेट: $20 लाख ते $50 लाख (₹16 ते ₹40 कोटी) पर्यंत मेंटेनन्स खर्च
अजून कुठे खर्च होतो?
इंधन खर्च: $4 ते $7 प्रति गॅलन
क्रू पगार: पायलट, को-पायलट, फ्लाइट अटेंडंट्स
उदाहरण: Gulfstream G650 चा एक तासाचा फ्लाइट खर्च $3,000 ते $5,000 असतो (₹2.5 लाख ते ₹4 लाख)
किती कमाई असली पाहिजे?
जर तुम्ही विचार करत असाल की एवढा खर्च तुम्ही झेलू शकता का, तर लक्षात ठेवा:
लाइट जेट: नेट वर्थ $25 मिलियन+ (₹200 कोटी+), वार्षिक उत्पन्न $5 मिलियन+ (₹40 कोटी+)
मिड-साइज जेट: नेट वर्थ $50 मिलियन+ (₹400 कोटी+), वार्षिक उत्पन्न $10 मिलियन+ (₹80 कोटी+)
लार्ज जेट: नेट वर्थ $100 मिलियन+ (₹800 कोटी+), वार्षिक उत्पन्न $20 मिलियन+ (₹160 कोटी+)
जर तुम्ही वर्षाला 300 तासांपेक्षा कमी प्रवास करत असाल, तर प्रायव्हेट जेट घेण्याऐवजी चार्टर करणे जास्त योग्य. यामध्ये मेंटेनन्स, टॅक्स, क्रू पगार यांचा त्रास नाही. नेटजेट्स किंवा fractional ownership सारखे पर्यायही उपलब्ध आहेत.