AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway: रेल्वेची चाकं का नसतात रंगीत? त्यांना का करत नाही Paint? 99 टक्के लोकांना नाही माहिती

Railway Wheels why not Painted: भारतीय रेल्वे ही दळणवळणाचे मोठे साधन आहे. स्वस्त आणि जलद प्रवासाचे ते साधन आहे. रेल्वेविषयी अनेक रोचक माहिती प्रवाशांना नसते. रेल्वेच्या चाकांविषयी अशीच एक रोचक माहिती समोर आली आहे.

Indian Railway: रेल्वेची चाकं का नसतात रंगीत? त्यांना का करत नाही Paint? 99 टक्के लोकांना नाही माहिती
रेल्वेची चाकं पेंट का नसतातImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 29, 2026 | 3:51 PM
Share

Indian Railway: भारतात दिवसागणिक रेल्वे कात टाकत आहे. नव्या दमाच्या ट्रेन ताफ्यात येत आहेत. बुलेट ट्रेनपासून ते वंदे भारत ट्रेनपर्यंत अनेक बदल आणि नवीन रेल्वे मार्गांचे जाळे यामुळे प्रवाशांचा कल रेल्वेकडे वाढला आहे. देशात रेल्वेचे मोठे जाळे आहे. रेल्वे ही देशातील सर्वसामान्यांची जीवन वाहिनी आहे. आजही लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करतात. अनेकांसाठी हा बजेट फ्रेंडली पर्याय आहे. स्वस्त आणि आरामदायक साधन म्हणून रेल्वे लोकप्रिय आहे. रेल्वेविषयी अनेक माहिती प्रवाशांना नसते. रेल्वेचे सिग्नल, रंगपट्टी आणि इतर गोष्टींची माहिती नसते. रेल्वेचे डब्बे हे विविध रंगांनी न्हाऊन निघतात. पण चाकं रंगबिरंगी का नसतात असा सवाल अनेकांच्या मनात येतो. काय आहे त्यामागील कारण?

अनेकजण ट्रेनने प्रवास करतात. कोच, इंजिन आणि चाकं ही नेहमी प्रवास करताना दिसतात. रेल्वे कधी निळ्या, लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाची असते. इंजिनही विविध प्रकारचे असते. पण चाकं मात्र बदलत नाही. त्यांना कोणताही रंग नसतो. ती एकाच रंगाची असतात. रेल्वेची चाकं ही वजनाने जड असतात. पण ती रंगबिरंगी का नसतात, याची कारणं अनेकांना माहिती नाही.

काय आहे कारण?

रेल्वेची चाकं ही रंगबिरंगी का नसतात असे अनेकांना वाटते. त्यामागे काही कारणं आहेत. ट्रेनची चाकं ही अत्यंत दबाव आणि घर्षण सहन करतात. जेव्हा ट्रेन अत्यंत वेगाने रेल्वे रुळावरून धावते. तेव्हा चाकं रेल्वे रुळावरून जाते. जर या चाकांना रंग लावला तर या पेंट, रंग जास्त काळ टिकणार नाही. तो गळून पडेल. त्यामुळे वारंवार पेंट करावे लागेल. या प्रक्रियेत पैसा आणि वेळ दोन्हींचा अपव्यव होईल. त्यामुळे ही प्रक्रिया टाळली जाते. रेल्वेच्या चाकांना पेंट करणे त्यामुळे टाळले जाते.

तर याशिवाय सुरक्षेशी संबंधित अजून एक कारण आहे. ट्रेनच्या चाकं सतत घर्षण करतात. त्यामुळे चाकांना भेगा पडण्याची सतत भीती असते. विना पेंट असलेल्या चाकांमधील ही भेगा समोर येते. इंजिनिअर आणि तांत्रिक कर्मचारी निरीक्षण करताना छोटी भेग, क्रॅक सुद्धा तपासू शकतात. त्यांना ती लक्षात येते आणि चाक बाजूला करता येते. जर पेंट केलेले असेल तर भेगा दिसणार नाही आणि मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळू शकते.

तर अजून एक कारण तापमानाचे आहे. ट्रेनच्या चाकं ही घर्षणामुळे अत्यंत उष्ण आणि गरम होतात. विना पेंट धातुचे तापमान तपासणीत ओळखणे सोपे जाते. जर चाकावर पेंट असेल तर तापमानाचे आकलन होणे अत्यंत अवघड असते. रेल्वेच्या चाकांना रंग न देणे हा आळशीपणा अथवा दुर्लक्षाचा भाग नाही. तर ते एक धोरण आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच