Rich village : हे आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव, प्रत्येक गावकऱ्याच्या खात्यात 15 लाखाचा बँक बॅलन्स

| Updated on: Mar 30, 2023 | 3:02 PM

Indias Rich village : पैशाने इतकं श्रीमंत, सधन असलेलं भारतातील हे गाव कुठे आहे?. श्रीमंत गावाचा विषय येताच आपल्या डोळ्यासमोर परदेशातील गाव येतात.

Rich village : हे आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव, प्रत्येक गावकऱ्याच्या खात्यात 15 लाखाचा बँक बॅलन्स
Indias rich village
Follow us on

Indias Rich village : गावाचा विषय निघताच लगेच आपल्या डोळ्यासमोर शेतकरी, डोलणारी शेती, कच्ची मातीची घर, गायी-गुरं येतात. भारतात अशी फार कमी गावं आहेत, जी आर्थिक दृष्ट्या सधन आहेत. श्रीमंत गावाचा विषय येताच आपल्या डोळ्यासमोर परदेशातील गाव येतात. पण भारतात कुठलं गाव सर्वात श्रीमंत आहे, ते तुम्हाला ठाऊक आहे ?. आज आम्ही तुम्हाला अशाच भारतातील श्रीमंत गावाची गोष्ट सांगणार आहोत.

या गावातील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत आहे. या गावातील लोकांकडे 5 हजार कोटी रुपये कॅशमध्ये आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे 5 ते 10 लाख रुपये आहेत.

त्या श्रीमंत गावाच नाव काय?

विश्वातील सर्वात श्रीमंत गाव भारतात आहे. गुजरातमधील मदपारा गाव सर्वात श्रीमंत आहे. गुजरातच्या कच्छमध्ये हे गाव आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीकडे लाखो रुपये कॅशमध्ये आहेत. त्यामुळे एकाच गावात 17 बँकांच्या शाखा आहेत. रोज या बँकांमध्ये गावकऱ्यांची पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी रांग असते.

प्रत्येक व्यक्तीचा कमीत कमी बँक बॅलन्स 15 लाख

या गावातील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात कमीत कमी 15 लाख रुपये जमा आहेत. गावकऱ्यांचे 5 हजार कोटी रुपये बँकेत जमा आहेत. गावातल्या प्रत्येक घरात शहरापेक्षा चांगल्या सुविधा मिळतील. या गावातील लोकांना लग्जरी लाइफ जगण्याची सवय आहे. घरात एसी, कुलर, फ्रिज आणि सोलर पॅनल सारख्या वस्तू मिळतील.

हे गाव इतकं श्रीमंत का?

मदपारा गावात आधुनिक रुग्णालय, मोठ-मोठ्या शाळा, प्राचीन मंदिर, गोशाळा, गार्डन्स आदी सर्व सुविधा आहेत. या गावाच्या श्रीमंतीमागे एक प्रमुख कारण आहे, ते म्हणजे या गावातील 65 टक्के लोक NRI आहेत. या गावातील लोकांना परदेशातून दर महिन्याला डॉलर्समध्ये पैसा मिळतो. गावातील मुल मोठ्या शाळांमध्ये शिकतात.