लातूरच्या हॅप्पी इंडियन व्हिलेजवर अनोखा लग्नसोहळा, एचआयव्ही संक्रमित मुलांचा सत्यशोधक विवाह

सत्यशोधक पध्दतीने चार एचआयव्ही संक्रमित जोडप्यांचा विवाह उत्साह वातावरणात पार पडला. Happy Indian Village HIV infected persons Marriage story Latur

लातूरच्या हॅप्पी इंडियन व्हिलेजवर अनोखा लग्नसोहळा, एचआयव्ही संक्रमित मुलांचा सत्यशोधक विवाह
एचआयव्हीग्रस्तांचा सत्यशोधक विवाह सोहळा
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 1:25 PM

लातूर : जवळील हासेगाव येथील सेवालय संस्थेजवळ हॅप्पी इंडियन व्हिलेजवर एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. सेवालयातील हॅप्पी इंडियन व्हिलेजमध्ये चार एचआयव्ही संक्रमित जोडप्यांचं लग्न सत्यशोधक पद्धतीनं पार पडलं. सत्यशोधक प्रतिज्ञा वाचनानंतर,एकमेकांना पुष्पहार घालून नवविवाहितांनी त्यांच्या विवाहावर शिक्कामोर्तब केलं. उपस्थित मान्यवरांनी पुष्पवृष्टी करून त्यांना शुभेच्छा दिल्या. महत्त्वाची बाब म्हणजे,याचवेळी हासेगाव ग्रामपंचायतने वधु-वरांना त्यांच्या विवाह नोंदणीची प्रमाणपत्र बहाल केली. रूचकर जेवणाने या कार्यक्रमाचा समारोप झाला. (Happy Indian Village HIV infected persons Marriage story Latur)

सत्यशोधक पद्धतीनं लग्न

लातूरजवळील हासेगाव जवळ सेवालयातील हॅप्पी इंडियन व्हिलेजवर 14 फेब्रुवारी रोजी एकूण चार विवाह ठरले आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक विवाह पद्धतीद्वारे पुजा – महेश, सोनी – अक्षय, अश्विनी- राजबा व नेहा- राजकुमार हे विवाहबद्ध झाले आहेत. जन्मतःच एचआयव्हीबाधित असणाऱ्यांचे, आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरराज्यीय आणि पुनर्विवाह होत आहेत. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता यातून दिसून येईल. त्यातील सोनी-अक्षय हा विवाह माझ्यासाठी खास आहे, असं रविकांत बापटले यांनी म्हटलं आहे.

latur happy indian village marriage story 1

एचआयव्हीग्रस्तांचा सत्यशोधक विवाह सोहळा

सेवालय आणि हॅप्पी इंडियन व्हिलेजच्या पुढाकारानं सत्यशोधक पद्धतीन चार विवाह पार पडले. आपलं लग्न व्हावं,अशीच त्यांची इच्छा होती. ती इच्छापूर्ती या निमित्ताने होतेय. सेवालय व हॅप्पी इंडियन व्हिलेज परिवारसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे, असं रविकांत बापटले यांनी फेसबूक पोस्टमध्ये लिहीलं आहे.

सेवालयाची स्थापना

सेवालयाचे संस्थापक रविकांत बापटले हे मुळचे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील एका गावातील. त्यांनी सैन्यभरतीसाठी सोलापूरला प्रयत्न केले. तिथं उंची कमी असल्यामुळे त्यांचं स्वप्न भंग झालं होतं. रविकांत बापटले यांनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर त्यांनी 12 मित्रांसह ‘आम्ही सेवक’ म्हणून काम सुरु केलं.

latur happy indian village story

हासेगावच्या हॅप्पी इंडियन व्हिलेजवर सत्यशोधक विवाह

एचआयव्ही मुलांसाठी काम कसं सुरु केलं?

रविकांत बापटले सांगतात की, एका एचआयव्हीग्रस्त मुलाचा मृत्यू झाला होता. त्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणी पुढं आलं नव्हतं. त्या मुलाला किड्यांनी खालले होते. त्यामुलावर अंत्यसंस्कार करुन एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. 2007 साली हासेगावच्या माळावर साडे सहा एकरावर सेवालयाची सुरुवात केली. रविकांत बापटले यांच्या एका मित्राच्या आजोबांनी बापटले यांना साडेसहा एकर जमीन दिली. हासेगाव आणि लमाण तांडा यांच्यामध्ये सेवालय सुरु आहे. रविकांत बापटले यांनी सेवालय सुरु करताना शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि एक लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळाली.

latur happy indian village marriage story 2

हॅप्पी इंडियन व्हिलेज

सेवालयात कोण येत?

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मुलांसह, मुंबई, पुणे येथील काही मुलं सेवालयात राहतात. चांगली औषध सध्या मिळू लागली. त्यानंतर एचआयव्ही ग्रस्त मुलांसाठी सेवालयाच्या बाजूला एचआयव्ही ग्रस्त एका जागेत हॅपी इंडियन व्हिलेज सुरु करण्यात आलं. एचआयव्हीला पर्यायी नाव म्हणून हॅप्पी इंडियन व्हिलेज असं नाव देण्यात आलं. जग बदलण्यासाठी आपण स्वत: बदलून कामाला लागू तेव्हा खऱ्या अर्थानं बदलाला सुरुवात होईल, असं रविकांत बापटले सांगतात.

हॅप्पी इंडियन व्हिलेजची सुरुवात

सेवालयात एचआयव्ही असलेल्या 18 वर्षापर्यंतच्या मुलांना ठेवलं जातं. त्यापेक्षा अधिक वयाच्या एचआयव्ही बाधितांसाठी हॅप्पी इंडियन व्हिलेज सुरु करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

Happy New Year 2021 | सरत्या वर्षासह फॉरवर्ड मेसजलाही म्हणा ‘गुडबाय’, ‘या’ खास अंदाजात द्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा! 

2021 च्या आगमनाचं संपूर्ण जगात सेलिब्रेशन, पण भारतातील ‘या’ राज्यात नववर्षाचा जल्लोष नाही

(Happy Indian Village HIV infected persons Marriage story Latur)

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.