तुमची टूथपेस्ट व्हेज की नॉनव्हेज? कसं ओळखाल?

आपल्या दैनंदिन जीवनातील एका अत्यंत महत्त्वाच्या वस्तूबाबत ही बाब समोर आली आहे. दात स्वच्छ ठेवण्यासाठी आपण वापरत असलेल्या काही टूथपेस्टमध्ये प्राण्यांपासून मिळणाऱ्या घटकांचा वापर केला जातो. चला, सविस्तर जाणून घेऊया ही नेमकी काय बाब आहे आणि आपला टूथपेस्ट शाकाहारी आहे की नाही हे कसे ओळखायचे.

तुमची टूथपेस्ट व्हेज की नॉनव्हेज? कसं ओळखाल?
toothpaste
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 27, 2025 | 2:11 PM

आपण रोज सकाळी दात घासण्यासाठी वापरत असलेला टूथपेस्ट खरंच शाकाहारी (व्हेज) आहे की मांसाहारी (नॉन-व्हेज)? हा प्रश्न अनेकांना पडत असेल. आपल्या शरीराच्या स्वच्छतेसोबतच तोंडाची स्वच्छता, म्हणजेच ओरल हायजीनला आपण खूप महत्त्व देतो. सकाळी उठून दात घासल्याने तोंडातून दुर्गंधी येत नाही आणि बॅक्टेरिया जमा होत नाहीत. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की, तुमचा टूथपेस्ट नॉन-व्हेज आहे, तर धक्का बसेल ना? होय, काही टूथपेस्टमध्ये खरंच प्राण्यांपासून मिळणाऱ्या गोष्टींचा वापर केला जातो.

टूथपेस्टमध्ये मांसाहारी घटक का?

आपण सहसा टूथपेस्ट शाकाहारीच मानतो. भारतात तर उपवासाच्या दिवशीही लोक दात घासूनच बाकीची कामं करतात. पण काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्स टूथपेस्ट बनवण्यासाठी प्राण्यांच्या चरबीपासून मिळणारी ग्लिसरीन किंवा त्यांच्या हाडांपासून मिळणारे कॅल्शियम फॉस्फेट (Bone Phosphate) वापरतात. यामागे मुख्य कारण म्हणजे, प्राण्यांपासून मिळणारे हे घटक स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात. शिवाय, यामुळे टूथपेस्टला उत्तम पोत मिळतो आणि तो जास्त काळ टिकतो.

भारतातील टूथपेस्ट आणि शाकाहारीपणा:

भारतात तयार होणारे बहुतेक टूथपेस्ट नैसर्गिक घटकांपासून, जसे की लवंग, पुदीना यांसारख्या वनस्पतीजन्य पदार्थांपासून बनवले जातात. त्यामुळे भारतीय कंपन्यांच्या टूथपेस्टमध्ये सहसा मांसाहारी घटकांची समस्या नसते. मात्र, आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या बाबतीत ही शक्यता नाकारता येत नाही.

कसं ओळखाल तुमचा टूथपेस्ट शाकाहारी की मांसाहारी?

तुमचा टूथपेस्ट शाकाहारी आहे की मांसाहारी, हे ओळखणं खूप सोपं आहे. प्रत्येक टूथपेस्टच्या पॅकेटवर याची माहिती दिलेली असते:

शाकाहारी (Vegetarian) टूथपेस्टसाठी: पॅकेटवर हिरव्या रंगाचा चौकोन आणि त्यामध्ये हिरवा बिंदू (Green Dot in a Green Square) असतो. अनेकदा ‘100% Vegetarian’ असंही लिहिलेलं असतं.

मांसाहारी (Non-Vegetarian) टूथपेस्टसाठी: पॅकेटवर लाल रंगाचा चौकोन आणि त्यामध्ये लाल बिंदू (Red Dot in a Red Square) असतो.

पुढच्या वेळी टूथपेस्ट खरेदी करताना पॅकेटवरील हे चिन्ह नक्की तपासा, जेणेकरून तुमच्या खाण्याच्या सवयीनुसार योग्य टूथपेस्टची निवड करता येईल. आपल्या रोजच्या वापराच्या वस्तूंमध्येही अशा अनेक गोष्टी असू शकतात, ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते. त्यामुळे जागरूक राहणे महत्त्वाचे आहे!