श्रावण महिन्यात ‘या’ प्रसिद्ध शिवमंदिरांना द्या भेट

भगवान शंकराला समर्पित श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या खूप खास मानला जातो. या महिन्यात शिवभक्त उपवास करतात, शिव मंदिरांना भेट देतात. जर तुम्हालाही भगवान शकंराच्या भक्तीत मग्न व्हायचे असेल तर तुम्ही देशातील या प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊ शकता.

श्रावण महिन्यात या प्रसिद्ध शिवमंदिरांना द्या भेट
famous shiv temple to visit in shrawan 2025
Updated on: Jul 21, 2025 | 4:30 PM

महाराष्ट्रात काही दिवसांनी श्रावण महिना सुरू होणार आहे, तर आपल्या सर्वांनाच माहित आहे की हा श्रावण महिना शिवभक्तांसाठी खूप खास असतो. हा महिना भगवान महादेवाला समर्पित असल्याने या दिवसांमध्ये अनेक भोलेनाथांचे भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरांना भेट देण्यासाठी आणि महादेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी उपवास तसेच मनापासून आराधना करतात. जर तुम्हालाही या श्रावण महिन्यात भगवान शिवाचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही आपल्या देशातील काही प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊ शकता.

ही मंदिरे त्यांच्या भव्यतेसाठी खूप प्रसिद्ध आहेत . मग ते केदारनाथ धाम असो किंवा काशी विश्वनाथ मंदिर असो. श्रावणात या मंदिरांचे वातावरण पाहण्यासारखे आहे. येथे आल्यावर तुम्ही शिव भक्तीत तल्लीन व्हाल. चला तर मग या लेखात देशातील अशा प्रसिद्ध शिव मंदिरांबद्दल जाणून घेऊयात जिथे तुम्ही श्रावण महिन्यात जाऊन भोलेनाथाचा आशीर्वाद घेऊ शकता आणि तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता.

बैद्यनाथ मंदिराला द्या भेट

सर्वप्रथम झारखंड राज्यातील देवघर जिल्ह्यात असलेल्या बैद्यनाथ मंदिराबद्दल बोलूयात, हे महादेवाचे मंदिर
त्याच्या भव्यतेसाठी आणि मान्यतेसाठी खूप प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की लंकेचा राजा रावणाने येथे एक ज्योतिर्लिंग स्थापित केले होते, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. श्रावण महिन्यात कावड यात्रेकरू येथे जल अर्पण करण्यासाठी येतात. अशा वेळेस येथे खूप गर्दी दिसून येते. म्हणून जर तुम्हाला येथे जायचे असेल तर कावड यात्रेची वेळ पाहून येथे या.

त्र्यंबकेश्वर मंदिरात स्नान करा

भगवान महादेवाचे त्र्यंबकेश्वर हे भव्य मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तसेच, येथे भगवान शिवाच्या तीन मुखांचे एक विशेष लिंग स्थापित केले आहे, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिनिधित्व करते. श्रावण महिन्यात लाखो भाविक येथे जलाभिषेक आणि स्नानासाठी येतात.

काशी विश्वनाथ मंदिराला द्या भेट

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असलेले हे मंदिर भगवान शिवाच्या सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. हे खूप पूजनीय आहे. असे म्हटले जाते की येथे मृत्यूपासून मुक्तता मिळते आणि भगवान शिव स्वतः मोक्ष देतात. श्रावण महिन्यात लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. विशेषतः सोमवारी येथे शिवभक्तांची गर्दी जमते.

महाकालेश्वर मंदिराच्या भस्म आरतीचा लाभ घ्या

उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर हे भोलेनाथच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. श्रावणमध्ये येथील वातावरण पाहण्यासारखे असते. लाखो भाविक शिवाच्या पूजेत मग्न असतात. सर्वात खास गोष्ट म्हणजे हे मंदिर एकमेव आहे जे दक्षिणाभिमुखी ज्योतिर्लिंग आहे. येथे दररोज भस्म आरती केली जाते, जी श्रावण महिन्यात आणखी खास पद्धतीने साजरी केली जाते, ज्यामध्ये हजारो शिवभक्त सहभागी होतात.

केदारनाथ मंदिरालाही भेट देऊ शकता

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात असलेले केदारनाथ मंदिर हे सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. त्याचे धार्मिक महत्त्व देखील खूप आहे. पंच केदारांमध्ये केदारनाथ धाम सर्वात प्रमुख आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेले हे मंदिर त्याच्या धार्मिक श्रद्धेसाठी तसेच त्याच्या भव्यतेसाठी आणि सौंदर्यासाठी ओळखले जाते. तथापि श्रावण महिन्यात येथे मुसळधार पाऊस पडतो आणि रस्ते देखील धोकादायक बनतात. अशावेळेस जर तुम्ही श्रावणात येथे जाण्याचा विचार करत असाल तर तेथील रस्ते आणि हवामान तपासल्यानंतरच जाण्याचा प्लॅन करा.