
बाल्कनीमध्ये, खिडकीत कबुतर उच्छाद मांडतात. कबुतर दररोज बाल्कनीमध्ये ठेवलेले कपडे घाण करतात. किंवा आवाजामुळे त्रास होतो. तसेच त्यांची विष्टा आणि पिसांमुळे त्वचेचे आणि श्वसनाचे आजार होतात. कितीही हाकललं तरी कबुतरे बाल्कनीत येतातच येतात. पण याबाबत काही उपाय आहेत ते केल्यास कबुतर नक्कीच बाल्कनीत येण्यास टाळतील. . कबुतरांपासून सुटका मिळवण्यासाठी टिप्स जाणून घेऊया.
व्हिनेगर स्प्रे करा: जर तुम्हाला तुमच्या बाल्कनीतून कबुतरांना काढून टाकायचे असेल, तर एका भांड्यात दोन चमचे व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांचे द्रावण तयार करा, ते स्प्रे बाटलीत भरा आणि हे द्रावण बाल्कनीमध्ये चांगले फवारणी करा, कबुतरे वासाने पळून जातील आणि कधीही परत येणार नाहीत.
डिंक: याशिवाय, तुम्ही कबुतरांना हाकलण्यासाठी डिंक देखील वापरू शकता. बाल्कनीमध्ये विविध ठिकाणी डिंक चांगले पसरवा, यामुळे कबुतरांना बाल्कनीमध्ये बसण्यापासून रोखता येईल, कारण त्यांना चिकट जागांवर बसणे आवडत नाही किंवा तुम्ही त्याऐवजी मध देखील लावू शकता.
वाइन आणि दालचिनी: कधीकधी कबुतरांचा त्रास एवढा वाढतो की ते दिवसभर बाल्कनीत तसेच खिडकीत बसून बसून घाण करतात. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही वाइन किंवा दालचिनी वापरू शकता. यासाठी तुम्हाला एका भांड्यात पाणी, वाइन आणि दालचिनी पावडर मिसळावी लागेल आणि दिवसाच्या सुरुवातीला ते शिंपडावे लागेल. कबुतर ज्या ठिकाणी येऊन बसतात त्या ठिकाणी याची जास्त फवारणी करा. त्याच्या तीव्र वासामुळे कबुतर येथे बसणार नाहीत.
काळी आणि लाल मिरची: पाण्यात काळी मिरीची पावडर मिसळून फवारणी करावी लागेल. तुम्ही पाण्यात लाल मिरची पावडर मिसळून देखील फवारणी करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, दोन्ही मिसळून बाल्कनीत फवारणी करा. यामुळे कबुतरांना बाल्कनीत येण्यापासून रोखता येईल. कारण हा तिखट वासही कबुतरांना अजिबात सहन होत नाही.
चमकदार वस्तू टांगा: बाल्कनी किंवा टेरेसपासून कबुतरांना दूर करण्यासाठी, चमकदार पॉलिथिन किंवा जुनी डीव्हीडी लटकवा. ती अशा ठिकाणी लटकवा जिथे प्रकाश थेट परावर्तित होतो. यामुळे कबुतरांना भीती वाटते आणि ते जवळ येत नाहीत.