
Raksha Bandhan 2025: राखीबंधन हा भारतातील प्रमुख सणापैकी एक आहे. भाऊ आणि बहिणीचे प्रेमाचे प्रतिक असलेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्याच्या मास प्रौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. हा सण केवळ एक धागा बांधण्याचा सण नाही तर नात्याला आणखी मजबूत करण्याची पवित्र क्षण आहे. यावर्षी प्रोर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या तिथी आणि मुहूर्ताबद्दल बरेच गैरसमज आहे. यंदा रक्षाबंधन ९ ऑगस्ट २०२५ ला साजरे केले जात आहे. या दिवशी अनेक शुभ योग देखील निर्माण झाले आहेत.या शिवाय भद्रा औक पंचकाचे सावटही नाही.त्यामुळे बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर सकाळपासून दुपारी आरामात राखी बांधू शकतात. टॅरो कार्ड रिडर आणि न्युमरोलॉजी एक्सपर्टच्या मते राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त, पूजा विधी, कथा, मंत्रासह माहिती पाहूयात..
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त (Raksha Bandhan 2025 Shubh Muhurat) – द्रिक या ऑनलाइन हिंदू पंचांगानुसार रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ५.४७ वाजल्यापासून सुरु होत असू तो दुपारी १.२४ वाजेपर्यंत राहणार आहे.
सर्वार्थ सिद्धि योग – सकाळी ५.४७ वाजल्यापासून दुपारी २.२३ वाजेपर्यंत
सौभाग्य योग – सकाळी प्रात:काळापासून 10 ऑगस्टच्या पहाटे २.१५ वाजेपर्यंत
शोभन योग – १० ऑगस्टला पहाटे २.१५ वाजेपर्यंत
ब्रह्म मुहूर्त- सकाळी ४.२२ ते ५.०४ वाजेपर्यंत
अभिजीत मुहूर्त- दुपारी १२.१७ वाजल्यापासून ते १२.५३ वाजेपर्यंत
रक्षाबंधन का साजरे केले जाते आणि नेमकी केव्हापासून ही प्रथा सुरु झाली आहे ? हे पाहायला गेले तर याचा इतिहास खुप जुना आहे. याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
देवता आणि असुर यांच्या युद्धात जेव्हा इंद्र देव कमजोर पडू लागले तेव्हा त्यांची पत्नी इंद्राणी यांनी त्यांच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले आणि त्यांच्या दीर्घायुष्याची आणि विजयाची प्रार्थना केली. त्यानंतर इंद्र देवाचा विजय झाला.
जेव्हा भगवान श्रीकृष्णांना जखम झाली तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून त्यांच्या हातावर बांधला. दुर्योधनाने ज्यावेळी द्रौपदीचे वस्रहरण केले त्यावेळी श्रीकृष्णांनी तिला वाचवले. हे राखीचे एक सर्वात भावूक उदाहरण आहे.
रानी कर्णावती हीने मुगल सम्राट हुमायूंला राखी पाठवली आणि संरक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर हुमायूंने राखीची लाज राखली आणि तिला मदत केली.
ज्योतिषांच्यानुसार, या वर्षांचा राखीचा सण खास आहे. कारण एकीकडे हे वर्षे मंगळाचे म्हटले जात आहे. मंगळास साहस, ऊर्जा आणि सुरक्षेचा ग्रह मानला जातो. याचा प्रभाव या रक्षाबंधनाला आणखी शक्तीशाली आणि सकात्मक बनवत आहे. या वर्षीच्या रक्षाबंधनावर मंगळ ग्रहाची विशेष दृष्टी असणार आहे.ज्यामुळे भावा-बहिणीचे नाते मजबूत, साहस आणि सहयोग वाढवणारे बनेल. हा दिवस नवे संकल्प आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असणार आहे.