त्सुनामीत समुद्रात अडकलेल्या जहाजांसोबत काय होतं?

सध्या रशियात मोठा भूकंप आला आहे. या भूकंपामुळे त्सुनामी निर्माण झाली आहे. त्सुनामीत मोठे जहाज बुडतात की नाही, असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो.

त्सुनामीत समुद्रात अडकलेल्या जहाजांसोबत काय होतं?
cruise ship in tsunami
| Updated on: Jul 30, 2025 | 4:35 PM

सध्या रशियात 8.8 रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला झाला. या भूकंपामुळे तिथे त्सुनामी आली आहे. रशियातील कामचटका येथे झालेला भूकंप हा जगातील सर्वात मोठा सहावा भूकंप आहे. या भूकंपामुळे समुद्रात 4 मीटरपर्यंतच्या लाटा उसळल्या आहेत. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, एवढ्या मोठ्या त्सुनामीत मोठ्या जहाजांचं नेमकं काय होतं? मोठे जहाज अशा त्सुनामीत बुडतात की नाही? असा सवाल विचारला जात आहे.

समुद्रात अडकलेल्या जहाजांसोबत काय होतं?

रशियातील समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या लाटा आदळताना दिसत आहेत. तर दुसरीकडे याच लाटा जपानाच्या पूर्वी समुद्रकनाऱ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आगामी संकटाची चाहूल लक्षात घेता 20 लाख लोकांना स्थानांतरीत करण्यात आले आहे. आता त्सुनामीच्या काळात समुद्रात अडकलेल्या जहाजांसोबत काय होतं? महाकाय जहाज त्सुनामीदरम्यान बुडतात का हे समूजन घेऊ.

मोठे जहाज किंवा क्रुझ शीपसोबत काय होतं?

त्सुनामीमध्ये काही मोठे जहाज आणि क्रूझ समुद्रात बुडून जातात तर काही जहाज हे समुद्रात बुडत नाहीत. याबाबतची माहिती भूकंप वैज्ञानिक डॉ. थॉमस हीटन यांनी माहिती दिली आहे. त्सुनामी आलेली असताना एखादे मोठे जहाज समुद्रात असेल तर आता आपण फसलो आहोत, असे लोकांना वाटते. मात्र एखादे मोठे जहाज किंवा क्रूझ त्सुनामीदरम्यान बुडणार की नाही हे त्याच्या ठिकाणाहून ठरतं. जहाज भर समुद्रात असेल तर ते पाण्यात बुडण्याची शक्यता कमी असते. कारण समुद्रात त्सुनामींचा वेग जास्त असतो. या काळात समुद्राच्या लाटा एक ते दोन मीटर उंच असतात.

अशा जहाजांवर काहीही परिणाम होत नाही

समुद्रातील दोन ते तीन मीटर उंचीच्या लाटांशी सामना करता यावा हीच बाब लक्षात ठेवून मोठ्या जहाजांची बांधणी केलेली असते. त्यामुळे त्सुनामी आल्यावर दोन ते तीन मीटर उंचीच्या लाटांचा अशा जहाजांवर काहीही परिणाम होत नाही. शिवाय मोठे जहाज आणि क्रूझ शिप यांचे वजन खूप असते. त्यामुळे त्सुनामीतील लांटांचा अशा जहाजांवर परिणाम होत नाही.

त्सुनामीत जहाज कधी बुडते?

जहाज जेव्हा भर समुद्रात असते तेव्हा ते बुडण्याची शक्यता नसते. मात्र हेच जहाज जेव्हा किनाऱ्यावर असते तेव्हा ते बुडण्याची शक्यता जास्त असते. कारण त्सुनामीच्या लाटा जेव्हा किनाऱ्यावर येतात तेव्हा त्या अधिकच विध्वंसक होतात. या लाटांची उंची वाढलेली असते त्यामुळे जहाज किनाऱ्यावर असताना या लाटांचा सामना करू शकत नाही परिणामी असे जहाज उद्ध्वस्त होण्याची शक्यता जास्त असते.