AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापांचं सर्वात गुपित रहस्य, फळभाज्यांना दंश केला तर… माणसालाही मोठा धोका? वाचून हैराण व्हाल!

Snake Fact : सापाने चावल्यास भाज्या विषारी होऊ शकतात का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याविषयी विज्ञान काय सांगते, हे सविस्तर जाणून घेऊयात.

सापांचं सर्वात गुपित रहस्य, फळभाज्यांना दंश केला तर... माणसालाही मोठा धोका? वाचून हैराण व्हाल!
Snake Fact Image Credit source: AI
| Updated on: Apr 27, 2026 | 6:45 PM
Share

साप दिसताच अनेकांची भंबेरी उडते, कारण सापाने दंश केला तर आपला जीव जाऊ शकतो. अनेकदा साप शेतात आढळतो, त्यामुळे तुम्हाला असे वाटले आहे का की, जर साप शेतात जमिनीवर असलेल्या एखाद्या भोपळ्याला किंवा वांग्याला चावला तर त्या भाजीमध्ये विष पसरते का? तसेच ती भाजी खाल्ल्यास माणसाच्या जीवाला धोका होऊ शकतो का? आज आम्ही तुम्हाला याबाबत विज्ञान काय सांगते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

साप चावल्याने भाजी विषारी होते का?

शेतात असलेल्या एखाद्या भाजीला सापाने दंश करण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण साप निर्जीव वस्तूंवर किंवा वनस्पतींवर हल्ला करत नाहीत. मात्र चुकून जर सापाने एखाद्या भाजीला चावा घेतला आणि विष भाजीला लागले, तरी त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता खूप कमी असते. यामागे काही महत्त्वाची वैज्ञानिक कारणे आहेत.

वेनम आणि पॉइजनमधील फरक

सापाचे विष हे वेनमअसते, ते पॉइजन नसते. वेनमचा परिणाम ते थेट रक्तात गेल्यास होतो. जर ते पोटात गेले आणि तोंडात किंवा पचनसंस्थेत जखम नसेल, तर पोटातील आम्ल (HCL) ते प्रथिनांप्रमाणे पचवते. त्यामुळे या विषाचा कोणताही परिणाम होत नाही.

वनस्पतींची शोषण क्षमता

वनस्पती मानवी शरीराप्रमाणे विष संपूर्ण प्रणालीत पसरवत नाहीत. सापाचे विष हे जटिल प्रथिनांचे मिश्रण असते, जे वनस्पतींच्या पेशींमार्फत भाजीच्या आतील भागात सहज पसरत नाही. त्यामुळे एखाद्या भाजीवर सापाचे विष पसरले असले तरी त्याचा फार परिणाम होत नाही.

साप आणि भाज्यांबाबत महत्त्वाच्या गोष्टी

  • हल्ल्याची प्रवृत्ती : साप साधारणपणे उंदीर, बेडूक किंवा माणसांसारख्या जिवंत प्राण्यांवर हल्ला करतात. त्या कधीही भाज्यांना दंश करत नाहीत.
  • स्वच्छता : जर भाजीच्या बाहेरील भागावर सापाचे विष लागले असेल, तर भाजी नीट धुतल्याने आणि शिजवल्याने ते नष्ट होण्याची शक्यता असते.
  • पचनसंस्था : मानवी पचनसंस्था अशा जटिल प्रथिनांना तोडून टाकते.
  • भाज्या धुणे आवश्यक : साप चावला नसला तरी सापाच्या शरीरावरील बॅक्टेरिया किंवा सालेमोनेला सारखे जंतू भाज्यांवर लागू शकतात, त्यामुळे भाज्या नेहमी स्वच्छ धुवूनच खाव्यात.

दरम्यान, सापाने दंश केलेली भाजी खाल्याने मृत्यू होता असं जर तुम्हाला सांगितलं तर असत्य आहे. विज्ञानानुसार सापाच्या विषाचा फासरा परिणाम होत नाही. असं असलं तरी तुम्ही फळे खाण्यापूर्वी स्वच्छ धुवावीत तसेच भाज्या धूवून नंतर त्या पूर्णपणे शिजवाव्यात आणि नंतर त्याचे सेवन करावे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत