AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या घरातही असू शकतो साप, या 5 जागा म्हणजे सापांचे माहेरघर; लपून करू शकतो हल्ला

Snake Hiding Spots : साप अगदी लहान फटींमधूनही घरात शिरू शकतात आणि अनपेक्षित ठिकाणी लपून बसू शकतात. साप लपण्याची 5 ठिकाणे खालीलप्रमाणे असू शकतात.

तुमच्या घरातही असू शकतो साप, या 5 जागा म्हणजे सापांचे माहेरघर; लपून करू शकतो हल्ला
Snake In House Image Credit source: Google
| Updated on: Apr 26, 2026 | 10:18 PM
Share

साप पाहताच अनेकांची झोप उडते, जर साप तुमच्या घरात आढळला तर ही चिंतेची बाब ठरू शकते. कारण साप अनेकदा नदी, शेत किंवा जंगलाजवळ आढळतात आणि जर तुमच्या घरात साप येण्याची शक्यता आणखी वाढते. उन्हाळा सुरू होताच जंगली प्राणी, विशेषतः साप, मानवी वस्तीकडे वळू लागतात. तुम्हाला असे वाटत असेल की घराचे दरवाजे बंद केले की चिंता नाही. मात्र साप अतिशय बारीक फटीतूनही घरात प्रवेश करू शकतात. घरातील काही ठिकाणांकडे लोक दुर्लक्ष करतात आणि हीच ठिकाणे सापांसाठी सुरक्षित लपण्याची जागा ठरतात. घरातील अशी कोणती ठिकाणे आहेत, जिथे साप लपू शकतात याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अंधार असणारे आणि ओलसर कोपरे

सापांना थंड आणि अंधार असणाऱ्या जागा खूप आवडतात. तुमच्या स्टोअररूममध्ये ठेवलेले जुने बॉक्स, भंगार सामान किंवा जिन्याखालील जागा त्यांच्यासाठी लपण्याची उत्तम जागा असते. कारण या ठिकाणी लोकांचा वावर खूप कमी असतो. जर तुमच्या स्टोअररूममध्ये जुने सामान खूप साचले असेल, तर ते वेळोवेळी व्यवस्थित करा आणि अचानक तिथे जाऊ नका. अन्यथा तुम्हाला साप आढळू शकतो.

बाथरूम आणि ड्रेनेज पाइप

बाथरूममधील सिंक आणि टॉयलेट पॉटमधूनही साप घरात शिरू शकतात. पाइपलाइनमधील ओलावा आणि तिथे असणारे बेडूक किंवा उंदीर सापांना आकर्षित करतात. जर ड्रेनेजची जाळी तुटलेली असेल, तर ती सापांसाठी खुला मार्ग बनू शकते. यातून साप घरात प्रवेश करू शकतात.

किचनमधील उपकरणे आणि कपाटे

किचनमध्ये फ्रिजच्या मागील उबदार जागा किंवा ओव्हनखालील रिकामी जागा सापांना आकर्षित करू शकते. याशिवाय जमिनीवर ठेवलेली कपड्यांची कपाटाच्या खाली मोकळी जागा असेल तर त्याच्या खालीही साप लपू शकतात. तसेच बूट रॅक किंवा बाहेर ठेवलेल्या बुटांमध्येही साप अनेकदा गुंडाळून बसतात. त्यामुळे कोणतीही बंद जागा किंवा वस्तू वापरण्यापूर्वी एकदा खात्री करा.

तसेच जर घरातील बराच काळ बंद असलेल्या जागांची साफसफाई करायची असेल, तर थेट हात लावण्याऐवजी आधी काठी किंवा लांब वस्तूने हलवून ती जागा सुरक्षित आहे का हे तपासा आणि त्यानंतर त्या जागी साफसफाई करा. अशाप्रकारे तुम्ही सापांपासून सुरक्षित राहू शकता.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले